Santosh Deshmukh Murder Case : घुले, आंधळे अन् सांगळे 'वाँटेड'; पोलिस चप्पा चप्पा छान रही है!

Beed Santosh Deshmukh murder case Sudarshan Ghule Krishna Andhale Sudhir Sangle declared wanted police : बीडमधील संतोष देशमुख हत्येत पसार असलेले संशयित सुदर्शन घुले, कृष्णा अंधाळे आणि सुधीर सांगळे यांना बीड पोलिसांनी 'वाँटेड' घोषित केले.
Santosh Deshmukh Murder Case 2
Santosh Deshmukh Murder Case 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख हत्येला आता 28 दिवस झाले आहेत. या हत्येत आतापर्यंत चार जणांना अटक झालेली आहे. परंतु या हत्येतील तिघे संशयित सुदर्शन घुले, कृष्णा अंधाळे आणि सुधीर सांगळे अजूनही पसार आहेत.

त्यांच्या शोधासाठी बीड पोलिस महाराष्ट्राचा चप्पा चप्पा छान रही है! याशिवाय इतर राज्यात देखील शोध घेत असताना बीड पोलिसांना या तिघांविरोधात फासे अधिकच आवळले असून, त्या तिघांना 'वाँटेड' म्हणून घोषित केले आहे. तसे पत्रक बीडच्या पोलिस अधीक्षकांनी काढले आहे.

सुदर्शन घुले, कृष्णा अंधाळे आणि सुधीर सांगळे या तिघांची माहिती देणाऱ्याची नावे गुप्त ठेवली जाणार आहेत. तसेच खात्रीशीर माहिती देणाऱ्याला बक्षीस देखील दिले जाणार आहे, असे पत्र बीडचे (Beed) पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी काढले आहे. या तिघांचे चित्र असलेले छायाचित्रांचे फलक छापले गेले आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Santosh Deshmukh Murder Case 2
Maharashtra Poverty Alleviation : महाराष्ट्रातील दारिद्र्य निर्मूलनाचे नेमकी कोणती आव्हानं...

संतोष देशमुख यांच्या हत्येत विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या चौघांना अटक झालेली आहे. याच गुन्ह्याशी संशयित असलेला वाल्मिक कराड याला बीड पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली असून, त्याला केज न्यायालयाने 15 दिवसांची पोलिस (Police) कोठडी सुनावलेली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 28 दिवस झाले आहे. तरी यातील संशयित सुदर्शन घुले, कृष्णा अंधाळे आणि सुधीर सांगळे या तिघांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे बीड पोलिसांनी पसार तीन आरोपींना 'वाँटेड' म्हणून घोषित केले आहे. मालमत्ता जप्तीनंतर बीड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case 2
OBC leader on Mahayuti Goverment : 'या सरकारकडून समाजावर अन्याय होतोय'; ओबीसी नेत्याचा महायुतीवर हल्लाबोल

आंधळे 2023 पासून पसार असल्याची नोंद...

संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या आरोपात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे पसार आहे. यापैकी कृष्णा आंधळे हा हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपात पोलिस डायरीत 2023 पासूनच पसार म्हणून घोषित केले आहे. पण तरीही तो उघड माथ्याने फिरत होता. सुदर्शन घुलेवरही 2023 मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्या खटल्यात तो जामिनावर बाहेर होता.

घुले, सांगळे अन् आंधळेंवर दाखल गुन्हे

28 ते 30 दिवस होऊनही अपहरण आणि हत्येचे तीनही मुख्य आरोपी पोलिसांना सापडलेले नाही. त्यामुळे हत्येच्या जवळपास महिन्याभरानंतर पोलिसांनी तिघांना 'वॉन्टेड' घोषित केले आहे. सुदर्शन घुले याच्यावर 10 गुन्हे, सुधीर सांगळेवर पाच, तर कृष्णा आंधळे याच्यावर 07 गुन्हे दाखल आहेत. यापैकी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे दोन्ही आरोपी ऊसतोड मुकादम आहेत. दादागिरी, भाईगिरी करत दहशत निर्माण करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com