Satish Bhosle Suresh Dhas Sarkarnama
मराठवाडा

Satish Bhosale attack case : सतीश भोसले ऊर्फ खोक्याच्या 'आका'वर कारवाई करा; 24 तासात दुसरा गुन्हा, आरोपी पसार

FIR registered Shirur police Satish Bhosale supporter Beed BJP MLA Suresh Dhas assaulting members Dhakne family : बीड भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक सतीश भोसले याने बावी इथल्या ढाकणे पिता-पुत्राला केलेल्या मारहाण प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Pradeep Pendhare

Beed crime news today : बीडमधील राजकीय गुन्हेगारी किती खोलवर रुजली आहे, यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या कशा क्रूरपद्धतीने झाली, याचे फोटो अन् व्हिडिओ समोर येताच, संतापाची लाट उसळली.

यानंतर आता भाजपच्या पदाधिकाऱ्याने बॅटने केलेल्या मारहाणीचा प्रकार समोर येताच संतापाची पुन्हा लाट उसळली आहे. सतीश भोसले ऊर्फ खोक्या असे मारहाण करणाऱ्याचे नाव असून, तो भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याचे सांगितले जाते. सतीशविरुद्ध गेल्या 24 तासांत दोन गुन्हे दाखल झाले असून, तो पसार आहे.

बीडच्या (BEED) बावी इथल्या ढाकणे पिता-पुत्राला सतीश भोसले ऊर्फ खोक्या आणि त्याच्या इतर साथीदारांनी मारहाण केल्याची घटना 19 फेब्रुवारीला घडली होती. या प्रकरणात आता शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केलेले ढाकणे कुटुंब प्रचंड दहशतीखाली असून आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दुसरीकडे सतीश भोसले याच्या 'आका'वर कारवाई करावी, अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान या दोन्ही गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिस सतीश भोसलेच्या शोधात आहेत. दरम्यान, आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सतीश भोसले हा आपला कार्यकर्ता असल्याची कबुली दिली आहे.

बीडमधून काल अर्धनग्न अवस्थेतील एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. मारहाण करणारा व्यक्ती हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं. हा व्हिडिओ चुकीचा असून तो दोन वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्याने मी त्या ठिकाणी गेलो होतो, असं स्पष्टीकरण सतीश भोसले यांनी दिलेलं आहे.

सतीश भोसलेविरुद्ध गेल्या 24 तासांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून तो पसार आहे. मात्र, त्याचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. सतीश भोसले ऊर्फ खोक्याने हजारो मुक्या प्राण्यांचा जीव घेतला आहे, तसेच विरोध करणाऱ्या माणसांना देखील अमानुष पद्धतीने मारहाण केली.

मुक्या प्राण्यांचे जीव घेतले

आष्टी, शिरूर आणि पाटोद्यामध्ये सतीश भोसले याची खोक्या पार्टी गोल्डमॅन, अशी ओळख आहे. माणसांना मारहाण करणारा सतीश भोसले आणि त्याच्या गँगने मुक्या प्राण्यांचे देखील अनेक जीव घेतले आहेत. हरीण, काळवीट, ससे आणि मोर या प्राण्यांचे जीव घेतले आहेत. मुक्या प्राण्यांचा जीव घेणाऱ्या सतीश भोसले आणि त्यांच्या गँगविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT