
Shiv Sena expansion : गोव्यात आधीच उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कार्यरत आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एन्ट्री झाल्यामुळं गोव्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. कारण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने गोव्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
आता गोव्यात शिवसेनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शनिवार ८ मार्च २०२५ रोजी गोव्यातील नानोडा, डिचोली येथील एका फार्म हाऊसवर राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या आयोजनासाठी गुरुवारी (६ मार्च)ठाणे, मुंबई येथे एक बैठक पार पडली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
तर गोव्यातील शिवसेना(Shivsena) मेळावा पक्षाच्या विस्तार धोरणाचा एक भाग आहे. गोवा हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं राज्य आहे. एकनाथ शिंदेंनी गोव्यात आपल्या पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
या मेळाव्यात गोव्यातील(GOA) शिवसेना कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिक सहभागी होतील. या मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहून गोव्यात पक्षाच्या आगामी योजना आणि धोरणांवर चर्चा करतील. तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना पक्ष स्थानिक समस्यांवर चर्चा करून त्यांचं निराकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं गोव्यात प्रवेश केल्यास इथलं राजकीय गणित काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर नवं समीकरण तयार होऊ शकतं, असंही बोललं जात आहे. शिवाय आगामी निवडणुकात याचा काय परिणाम होईल हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.