Pankaja Munde  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News: बीडमध्ये झळकले 'जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स..'; आता पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाले, आजच्या काळात CM होणं...'

Beed News: बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा वर्षाव करत समर्थकांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत. यातच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या आशयातील बॅनर्सने सर्वांचे लक्ष वेधले आहेत.

Deepak Kulkarni

Beed News: बीडमध्ये 'पंकजा मुंडे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा वर्षाव करत समर्थकांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत. यातच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या आशयातील बॅनर्सने सर्वांचे लक्ष वेधले असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत एकीकडे उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. याचदरम्यान, पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.

बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा येथे लोकनेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एकत्रित उपस्थिती लावली.

यावेळी पंकजा मुंडे यांनी बंजारा समाजाला संबोधित करताना अनेक भावनिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवात शक्ती नसेल तर शिव हा शव आहे. म्हणूनच स्त्री-पुरुष खांद्याला खांदा लावून चालले तरच शिवशक्ती निर्माण होते, असे त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी आजही बंजारा समाजात फारसा बदल झालेला नाही,अशी खंत व्यक्त केली. तसेच बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या चारपदरी रस्त्यांसह विविध विकासकामांचाही उल्लेख केला. वयाच्या 24 व्या वर्षी राजकारणात आले, आता 48 वर्षांच्या प्रवासानंतर राजकारणाचा अक्षरशः कंटाळा आला आहे,असे वक्तव्य केल्यानं त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शेतकरी आणि कष्टकरी समाजाचा उल्लेख करत, तुमच्या हातातील कोयता जाऊ नये, पण त्या कोयत्याला योग्य भाव आणि कष्टाला योग्य फळ मिळाले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. मुृख्यमंत्रीपदाचा उल्लेख करत आजच्या काळात मुख्यमंत्री होणं सोपं नाही.

मात्र, वसंतराव नाईक यांनी त्या काळात उत्तम नेतृत्व दिलं,असे सांगत त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याचाही गौरव केला. शेवटी मला सत्तेत नाही, तर तुमच्या मनात राहायचं आहे, असे भावनिक आवाहन करत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

महाराष्ट्रात अनेकदा नेत्यांच्या वाढदिवसाच्या वा विशेष प्रसंगी त्यांच्या समर्थकांकडून त्यांना 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असे दर्शवणारे फलक लावले जातात. पंकजा मुंडे बीड व परळी परिसरात मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्सवर हा उल्लेख पुन्हा चर्चेत आला आहे.यापूर्वीही वेळोवेळी विविध पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीत कार्यकर्त्यांनी अशा घोषणा केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT