Beed News : सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेले अन् 45 लाखांची लाच घेतली... वन विभागाच्या अधिकाऱ्याला ACBने रंगेहात उचललं

Political News : बैठक आटोपून घरी परतलेल्या विभागीय वन विभागाचे अधिकारी श्रीकांत लखमवाड यांनी तब्बल 45 लाखांची लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
shrinivas lakhmvad, beed Acb
shrinivas lakhmvad, beed Acb Sarkarnama
Published on
Updated on

Anti Corruption Bureau : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबतची बैठक आटोपून घरी परतताच 45 लाखांची लाच स्वीकारताना विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवाड याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने बीड प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक, विविध विकास कामांची उद्घाटने, लोकार्पण आणि बीडकरांच्या समस्यांवर ठोस निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री सुनेत्रा पवार गुरुवारपासून दोन दिवसांच्या बीड दौऱ्यावर होत्या. या निमित्ताने संपूर्ण जिल्हा प्रशासन, पोलीस अधिक्षक कार्यालय अलर्ट होते. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात कुठेही गडबड, गोंधळ होऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आली.

परंतु, पालकमंत्र्यांसोबतची बैठक आटोपून घरी परतलेल्या विभागीय वन विभागाचे अधिकारी श्रीकांत लखमवाड यांनी तब्बल 45 लाखांची लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. लखमवाड घरी गेले आणि 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

shrinivas lakhmvad, beed Acb
Maharashtra Politics Live Update : विलास घुले हत्या प्रकरण; आरोपींवरील कठोर कारवाईच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

विशेष म्हणजे, स्वीकारण्यात आलेल्या 45 लाखांच्या रक्कमेपैकी फक्त पाच लाखांच्या नोटा या खऱ्या आहेत, तर उर्वरित चाळीस लाखाच्या नोटा या डमी असल्याचेही कारवाईतून समोर आले आहे. लखमवाड यांनी 2025-26 मधील वृक्ष लागवडीची बिले मंजूर करून देणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने शुक्रवारी सापळा रचत ही कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे बीडमध्ये दाखल झाल्या आहेत.

shrinivas lakhmvad, beed Acb
PMC: पुणे महापालिकेचे बनावट लेटरहेड, IT चे बोगस सर्टिफिकेट; पुण्यात बेरोजगार तरुणांची लाखोंची फसवणूक, गृहविभागाची 'सुमोटो' चौकशी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com