Suresh Dhas sarkarnama
मराठवाडा

Corruption Case : भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर सव्वादोनशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राम खाडे न्यायालयात जाणार!

Ram Khade Allegation Against Suresh Dhas : बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात गावतलाव आणि पाझर तलाव दुरुस्तीच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप होताना दिसत आहे.

Jagdish Pansare

NCP-BJP Politics : बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, गैरकारभारावर विधानसभेत तुटून पडणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावरच आता मतदारसंघातील तलाव दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल सव्वादोनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांनी हे आरोप केले असून, या प्रकरणाची चौकशी होऊन कामे रद्द केली नाही, तर आपण केंद्रीय सचिवांपर्यंत जाऊ, तिथेही दाद मिळाली नाही, तर न्यायालयाचे दार ठोठावू, असा इशारा दिला आहे.

बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात गावतलाव आणि पाझर तलाव दुरुस्तीच्या तब्बल ११२५ कामांच्या मंजुरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या कामांच्या माध्यमातून तब्बल २२५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा कट रचण्यात आल्याचा आरोप राम खाडे यांनी करत थेट भाजप आमदार सुरेश धस यांचे यात नाव घेतले आहे.

'नरेगाचे' रूपांतर 'जीरामजी' योजनेत होण्याच्या अवघ्या १५ दिवस आधी ही ११२५ कामे एकाचवेळी मंजूर करण्यात आल्याचा दावा खाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक कामाची किंमत १९ लाख ९८ हजार ४०४ रुपये इतकीच असल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामपंचायतींची मागणी किंवा ठरावाशिवाय एवढ्या मोठ्या संख्येने कामांना एकाचवेळी मंजुरी कशी मिळाली? आणि प्रत्येक कामाची किंमत जवळपास २० लाख रुपयेच कशी? असा सवाल करत त्यांनी मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला.

बीडच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत राम खाडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्यांच्या तक्रारीनंतर १८ ऑगस्टपासून आयुक्तालयाच्या पथकाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आपण स्वतः चौकशी पथकासमोर जबाब नोंदविल्याचेही खाडे यांनी सांगितले.

या कामांच्या मंजुरीमागे आमदार सुरेश धस यांचा हात आहे. मात्र, तक्रार झाल्यानंतर धस यांनीच ६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मंजुरीतील अनियमिततेमुळे ही कामे रद्द करण्याची मागणी केली, असा दावाही खाडे यांनी केला. तसेच १५ ऑगस्टच्या सुट्टीच्या दिवशी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वतःच्या गावातील तलाव अधिकाऱ्यांना दाखविल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, चौकशीत न्याय मिळाला नाही किंवा ही कामे रद्द झाली नाहीत, तर केंद्रीय सचिवांची भेट घेण्यासोबतच आवश्यकता भासल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा राम खाडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता आयुक्तालयाच्या चौकशीत नेमकं काय समोर येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT