Suresh Dhas: 'आष्टी मतदारसंघ गुन्हेगारांचा अड्डा, त्यांचे म्होरके सुरेश धस...'; राष्ट्रवादीच्या नेत्यानं पोलिस अधीक्षकांकडेच दिली तक्रार

BJP MLA Suresh Dhas: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊसाहेब लटपटे यांनी आष्टी मतदारसंघ हा गुन्हेगारांचा अड्डा बनत चालला असून, या गुन्हेगारांचे म्होरके आमदार सुरेश धस आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे बीडच्या राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Suresh dhas.jpg
Suresh dhas.jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News: आमदार सुरेश धस यांचा आवाज असल्याचा आरोप होत असलेल्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवरुन बीड जिल्ह्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन विरोधकांसह सत्ताधारी पक्षांना घेरणारे आमदार सुरेश धस हेही अडचणीत आले आहे. अशातच आता धस पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊसाहेब लटपटे यांनी आष्टी मतदारसंघ हा गुन्हेगारांचा अड्डा बनत चालला असून, या गुन्हेगारांचे म्होरके आमदार सुरेश धस आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे बीडच्या राजकारण तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते भाऊसाहेब लटपटे हे याबाबत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाऊसाहेब लटपटे म्हणाले, चार दिवसांपूर्वी अश्लील शिवीगाळ केलेली कथित ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिपदेखील सुरेश धस यांचीच असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अफसर शेख यांच्यावर खोटा आर्म्स अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लटपटे यांनी केला आहे.

अफसर शेख यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा कथित खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिस अधीक्षकांनी स्वतः करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब लटपटे आणि मनोज चौधरी यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

Suresh dhas.jpg
Shivsena Vs BJP: 'मी भोळा राहिलो, तर भाजपवाले मला खाऊन जातील...”; एकनाथ शिंदेंच्या विश्वासू नेत्यानं महायुतीत उडवून दिली खळबळ

मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली होती. या कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचा असल्याचा आरोप केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमधील अज्ञात कार्यकर्त्याला करण्यात आलेली शिवीगाळ आणि बघून घेण्याचा दिलेला इशारा देणारा आवाज आमदार सुरेश धस यांचा असल्याचा आरोप झाला. या ऑडिओ क्लिपद्वारे सुरेश धस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही भाजप आमदाराच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

Suresh dhas.jpg
Ghodganga Sugar Factory: शिरूरचा ‘घोडगंगा’ पुन्हा सुरू होणार? सुनेत्रा पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश, अशोकबापूंना 'साईडलाईन'करुन माऊलीआबा अ‍ॅक्शन मोडमध्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com