Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी,एसआयटीच्या तपासानं वेग घेतला असून फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मोठं यश आलं आहे. या हत्येबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहे. यातच एसआयटीनं या घटनेतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले,सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतलं.
यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ सोनावणेलाही बेड्या ठोकल्या आहेत.तो दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh Case) अत्यंत जवळचा मित्र असून त्यानेच देशमुख यांचं लोकेशन आरोपींना दिले असल्याचे पोलिस तपासात धक्कादायक समोर आले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे एसआयटीने हाती घेतल्यानंतर तपास गती मिळाली आहे.सुरुवातीला तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवणार्या विरोधकांकडून आता सुरु असलेल्या तपासावर समाधान व्यक्त केले जात आहे. एसआयटीनं या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी सकाळीच एसआयटीने सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या दोघांना अटक केली.
पोलिसांना सुरुवातीपासूनच आरोपींना सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा कोणीतरी जवळचाच आणि गावातीलच व्यक्ती असणार असा संशय होता.त्याचवेळी पोलिसांच्या (Police) तपासात मस्साजोगच्याच सिद्धार्थ सोनवणेचे नाव समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे ज्यादिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यानंतर दोन दिवस सिद्धार्थ सोनवणे हा गावातच उपस्थित होता. तो देशमुख यांच्या अंत्यविधीमध्येही सहभागी झाला होता.मात्र, पोलिसांकडून ज्यावेळी आरोपींचा शोध सुरू झाला, तेव्हा अचानक सिद्धार्थ फरार झाला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावातच केंद्रित केलेले होते. अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे त्याचा शोध पोलीस यंत्रणेकडून घेण्यात येत होता. लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुणकूण सिद्धार्थला लागताच तो गावातून फरार झाला होता.15 दिवसांपासून फरार होता.
त्यानंतर जसा जसा तपास पुढे सरकत गेला तसा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सिद्धार्थ या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री पटली.त्याची शोधाशोध सुरू झाल्यानंतर तो मुंबईत लपून बसला असल्याची टीप पोलिसांना मिळाली.त्याने या काळात पाच सिमकार्ड वापरली. पण पोलिसांना मुंबईतील लोकेशन मिळताच त्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यात आला. यात सिद्धार्थ सोनावणेला एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावरुन पोलिसांनी उचललं.
आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे सोडला तर जवळपास सर्वच आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. लवकरच कृष्णा आंधळे यालाही ताब्यात घेणार आहे. त्यामुळे त्याच्या तपासात पोलिसांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागेचं कारण कारण समोर येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.