
Parbhani, 04 January : संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणीप्रकरणी आतापर्यंत जेवढे अटक झाले आहेत, ते सर्व फिल्मी स्टाईलने अटक झाले आहेत. हा जो परळी पॅटर्न दिसतोय ना. तो परळी पॅटर्न आपल्याला बंद करायचा आहे. खून प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत, त्यांचा मास्टर माईंड वाल्मिक कराड हा पुण्यातच होता. कराड हा २८ डिसेंबरपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये होता. त्या ठिकाणी तो इलाज करत नव्हता तर बेडवर बसून टीव्हीवर तमाशा बघत होता. त्या हॉस्पिटलमध्ये कराडला भेटायला कोण कोण आले होते, त्याचेही सीसीटीव्ही तपासा, असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले.
परभणीत काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) बोलत होते. ते म्हणाले, विधानसभेत सर्वच पक्षाचे आमदार बोलले आहेत. आजही व्यासपीठावर सत्ताधारीसह सर्वच पक्षाचे लोक आहेत. ते संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी बोलत आहेत. राजेश विटेकर यांच्या भाषणातला संदर्भ घेऊन विटेकरसाहेब, जो कोणी आहे, नाही तर तो वाल्मिक कराडच आहे, असे क्षीरसागर यांनी आमदार राजेश विटेकर यांना सुनावले.
आमदार क्षीरसागर म्हणाले, मी पहिल्यापासून मागणी करतोय की, सहा, नऊ आणि अकरा डिसेंबर ह्या तीन दिवसांचे रेकॉर्ड काढलं, तर सर्व काही मिळेल. सुरेश धस (Suresh Dhas) यांना मी रोज बोलतोय. तपासातसुद्धा काय चाललंय आणि काही नाही, ह्यांचे सीडीआर तपासले तर केवळ वाल्मिक कराडच नाही तर लय जण त्या सीडीआरवर येणार आहेत.
जेव्हा सभागृहात हा मुद्दा आला, तेव्हा सर्व पक्षाचे आमदार तळमळीने बोलत होते. सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी या प्रकरणाची दखल घेतली. ज्या वेळी बीड जिल्ह्यात आपल्यासारखी लोकं रस्त्यावर उतरले, तेव्हापासून तो फरारी झाले आहेत. सुरेशअण्णा माझी आणखी एक मागणी आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात. वाल्मिक कराड २८ डिसेंबरपर्यंत ज्या हॉस्पिटलमध्ये होता, त्या हॉस्पिटलचे नावही सांगतो आणि पत्रही देतो. त्या आठ दिवसांत पुण्यातील त्या हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराडला कोण कोण भेटायला आले होते, ते सीसीटीव्ही फुटेजमधून काढा, असेही क्षीरसागरांनी नमूद केले.
सरकारने या प्रकरणात ॲक्शन घेतल्यानंतर एसपी बदलेले. पण काही गोष्टी घडल्या आहेत, त्या तुम्हाला सांगाव्या लागतील. विरोधी बाकावर आहे म्हणून काहीही बोलून जायचं, हे बरोबर नाही. पण काही ठिकाणी कारवाईसुद्धा झालेली आहे. आमच्या बीड जिल्ह्यातील दोन नंबरचे धंदे बंद झाले आहेत. पण, तपास जेव्हा वाल्मिक कराडवर येतो, तेव्हा तुम्ही कुठंतरी थांबता. हे मी सांगणार आहे, असा दावाही क्षीरसागरांनी केला.
क्षीरसागर म्हणाले, गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड हा हॉस्पिटलमध्ये जाऊन थांबतो. त्याला फक्त आणि फक्त कारणीभूत...(तेव्हा गर्दीतून धनंजय मुंडे यांचे घेतले जाते) यातील काही गोष्टी प्रामुख्याने सांगतो की, मागच्या पाच वर्षांच्या कालावधीत जे मंत्री, पालकमंत्री होते. (तपासात जिथं अडचण होते, ते मी सांगतो) त्यांनी आणि वाल्मिक कराडने जिथं अडचण येते, त्या ठिकाणी त्यांच्या कालावधीत काही मर्जीतील लोक आणून बसवले होते. त्या अधिकाऱ्यांकडूनच फक्त मागंपुढं होतंय.
आमच्या तीनच मागण्या आहेत. मी अगदी पहिल्या दिवसांपासूनच करतोय. संतोष देशमुख खूनप्रकरण हे फास्ट ट्रॅकवर चालवा. अंडर ट्रायल चालवा आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. जे काही मास्टर माईंड किंवा सीडीआरवर सापडतील, त्यांना थेट फासावर चढवा, अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.