Beed woman assault case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारी राज्यात तसंच देशात चर्चेत आली. गुन्हेगारीत परिसीमा ओलंडणारी गुन्हे बीडमध्ये (Beed) घडत आहे. आता राज्याच्या गुन्हेगारीला हादरवून सोडले, असा प्रकार बीडमधील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
विवाहितेला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिला गाव चावडीमधील खांबाला बांधून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरनेर पोलिसांनी याप्रकरणी वैभव पटेकर याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
विवाहिता ही 17 वर्षांचा असून, तिने पोलिसांना (Police) फिर्याद दिली आहे. विवाहिता ही पती, सासू-सारे यांच्याबरोबर राहते. मंगळवारी दहा मार्चला ते रात्रीचं जेवण करून घरात झोपलेली होती. वातावरणात गरमी जास्त असल्याने रूमचा दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. याचाच फायदा आरोपी वैभव पटेकर याने घेतला.
दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत, बुधवारी 11 मार्चला पहाटे तीन वाजता वैभव पटेकर रूममध्ये घुसला. पीडिता हिला घरातून उचलून नेत नदीकडे घेऊन गेला. रूममधून घेऊन जात असताना पीडिताने ओरडण्याचा प्रयत्न केला. परंतु वैभव याने पीडिताचे तोंड दाबले. यानंतर नदीकडे घेऊन जात तिथं बळजबरीने अत्याचार केला, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
अत्याचारानंतर पीडितेला वैभव पटेकर हा गाव चावडीवर घेऊन गेला. तिथं चावडीच्या खांबाला बांधून पसार झाला. सकाळ होत असल्याने माणसं येत-जात होती. त्याचवेळी साफसफाई करण्यासाठी एक महिला तिथं आली. पीडिताने तिला सोडण्याची विनंती केली. पंरतु त्या महिलेने मदत केली नाही. बांधलेलं सोडवलं नाही, असं फिर्यादीनं म्हटलं आहे.
परंतु सफासफाईसाठी आलेल्या संबंधित महिलेने सरपंचाला प्रकार सांगितला. यानंतर सरपंच, गावातील काही लोक, पीडिताचे आईवडील, मावशी, चुलती-चुलते तिथं आले अन् पीडिताला सोडवलं आणि घरी घेऊन गेले. पीडितेने दोन दिवस आपल्याबरोबर काय झालं हे घरच्यांना कोणालाच सांगितलं नाही.
पण पीडिताने आई अन् मामाला वैभव पटेकर याने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. यानंतर त्यांच्या मदतीने पोलिस ठाण्यात येत तक्रार दिली. पिंपळनेर पोलिसांनी गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत, आरोपी वसंत गिराताम पटेकर याला पोलिसांनी तातडीने अटक केली.
वसंत पटेकर याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने त्याला 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांसह पिंक पथकाकडून तपास केला जात आहे. वैभव पटेकर याच्याबरोबर अन् कोणी सहभागी होत का? याची चौकशी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.