

Ahilyanagar crime news : अहिल्यानगर जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याच्या प्रकृतीबाबत, मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या दहा दिवसापूर्वी, जामखेडमध्ये त्याच्यावर गोळीबार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी, या गुन्ह्यात पुण्यातील गँग नीलेश घायवळ कनेक्शन समोर आणलं आहे.
सागर मोहोळकर याच्यावर तब्बल सहा ते सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याच्या शरीरातून आतापर्यंत दोन गोळ्या काढण्यात आल्या आहेत. अजूनही त्याच्या शरीरात चार गोळ्या असल्याची माहिती अहिल्यानगर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमधील सूत्रांकडून समोर आली.
कुख्यात गुंड पैलवान याच्यावर बुधवारी (ता. 4) रात्री साडेसात वाजता जामखेड शहरात गोळीबार झाला. दोन दुचाकीवरून आलेल्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याला सहा ते सात गोळ्या लागल्या. मोहोळकर याच्यावर पुणे (Pune) इथल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर हे उपचार सुरू आहेत. या कालावधीत शरीरातील दोन गोळ्या काढण्यात आल्या आहेत. तरीही अजून त्याच्या शरीरात चार गोळ्या असल्याची माहिती मिळते आहे. मान, पाठ, कंबर आणि मांडीत या चार गोळ्या आहेत. या गोळ्या कधी काढणार, याबाबत वैद्यकीय रिपोर्ट अजून समोर आलेला नाही.
गोळीबारात गंभीर झालेल्या मोहोळकर सुरवातीला व्हेंटिलेटर होता. आता त्याचे व्हेंटिलेटर काढले असून, त्याला जनरल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. असे असले तरी गेल्या दहा दिवसांपासून त्याच्या शरीरात चार गोळ्या असल्याची माहिती समोर येत आहे. जखमी असलेल्या मोहोळकर याच्याभोवती पोलिसांचा (Police) बंदोबस्त कायम आहे.
मोहोळकर याच्या राक्षसी ताकदीची अनेक कथा रंगवल्या जातात. जामखेडमधील झालेल्या गोळीबारात, हल्लेखोरानं एक गोळी थेट त्याच्या तोंडात मारली होती. ती गोळी तो हाताने काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यावर अनेक गु्न्हे दाखल असून, दोन खुनाचे गुन्हे आहेत.
नाशिक कारागृहातून महिन्याभरापूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. त्यातच त्याच्यावर पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याने गोळीबार केला. मोहोळकर अन् घायवळ हे एकाच जामखेड तालुक्यातील. पण घायवळ हा कुख्यात गुंड असून, तो पुण्यातून गँग चालवतो. या घायवळच्या मोहोळकर याने धाराशिव इथल्या यात्रेत कानशिलात लगावली होती.
घायवळच्या कानशिलात लगावल्यानंतर मोहोळकर चर्चेत आला होता. पुढे मोहोळकर याने घायवळसमोर माफीनामा दिला होता. ही कानशिलात लगावून घायवळपेक्षा वरचढ होण्याचा मोहोळकर याचा डाव होता. पण घायवळ गँगने पाळत ठेवून त्याच्यावर थेट हल्ला चढवला. गोळीबार केला. यात मोहोळकर गंभीर जखमी झाला आहे.
या गोळीबारप्रकरणी अहिल्यानगर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जामखेडमधून एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल, गोळी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. या गुन्ह्यातील तीन हल्लेखोर अजून पसार आहे. या हल्ल्यामागे थेट घायवळ गँग कनेक्शन आल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.