Santosh Deshmukh | Dhananjay Munde | Walmik Karad  sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case: बीडमधून मोठी अपडेट! अखेर मुंडेंच्या 'त्या' कार्यकर्त्याविरोधात पोलिसांनी अ‍ॅक्शन घेतलीच

Anjali Damania on Beed Crime : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे विरोधकांच्या बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन केल्या जात असलेल्या आरोपाला आणखी बळ मिळालं होतं.

Deepak Kulkarni

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे. यातच विरोधकांकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आता मुंडेंचा कार्यकर्ता कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे विरोधकांच्या बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन केल्या जात असलेल्या आरोपाला आणखी बळ मिळालं होतं. या व्हिडिओच्या आधारे आता पोलिसांनी मोठी अॅक्शन घेतली आहे.

अंजली दमानिया यांनी बुधवारी (ता. 24) रात्री ट्विट करत बीडमधील एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, कैलास फड याचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे.याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.विशेष म्हणजे,बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही अॅक्शन मोडमध्ये असून लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरित आरोपीला अटक करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत बीडमधील परवानाधारकांवरुन हल्लाबोल केला होता.त्या ट्विटमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या होत्या, परभणीत 32 आहेत तर अमरावती ग्रामीण मधे 243 शास्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वर्धस्ताने? 1222 अधिकृत शास्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील ? वाल्मिक कराड ह्यांच्या नावावर लाइसेंस आहे. पण त्यांच्याच गटातले कैलास फड व निखिल फड या दोघांकडे कोणतेही लायसन्स नाही.

मी एसपी नवनीत कावत यांना मेसेज पाठवला आहे की, त्यांना तात्काळ अटक करावी आणि ह्या कराड गँगला पहिला दणका द्यावा.या सगळ्या परवान्यांची तत्काळ चौकशी लावावी.आता त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता.या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT