Santosh Deshmukh Case : धक्कादायक! 'तुमचाही संतोष देशमुख करू...'; शिंदेंच्या आमदाराच्या पुतण्यांना धमकी, मराठवाड्यात चाललंय तरी काय?

Santosh Deshmukh Murder Case : माजी मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या दोन पुतण्यांना संतोष देशमुख यांच्याप्रमाणे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे सध्या धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Santosh Deshmukh, Eknath Shinde
Santosh Deshmukh, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News 24 Dec : बीड जिल्ह्यातील केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरून गेला आहे. सध्या या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू असून देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

शिवाय या हत्या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या दोन पुतण्यांना संतोष देशमुख यांच्याप्रमाणे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे सध्या धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत या दोघांना एक धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. ही चिठ्ठी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टर ड्रायव्हरमार्फत बंद पाकीटातून 100 रुपयांच्या नोटेसोबत देण्यात आली आहे.

Santosh Deshmukh, Eknath Shinde
Buldhana Hospital Fire : केंद्रीय राज्य आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; ग्रामीण रुग्णालयाला आग लागल्याने एकाचा मृत्यू

कारखान्याला ऊस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर तेर-ढोकी रस्त्यावर मुळेवाडी पाटीजवळ दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी अडवला. यावेळी त्यांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरकडे एक बंद पाकीट देत ते कारखान्यावर सुरक्षा रक्षकाकडे द्यायला सांगितलं. दरम्यान, हे बंद पाकीट उघडलं असता त्यामध्ये, 'तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल', असा मजकूर लिहिला होता.

Santosh Deshmukh, Eknath Shinde
Devendra Fadnavis : 'सीएम' फडणवीसांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले,आमच्याकडे 'मानापमान' मनात होतो,पण त्याचे...

दरम्यान, या धमकी प्रकरणी तेरणा कारखान्याचे शेतकी अधिकाऱ्यांनी ढोकी पोलिसात स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मात्र, या धमकीमुळे आता धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली असून धमकी देणाऱ्यांवर पोलिस काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com