Beed Crime News Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime: बीडच्या रस्त्यावर थरार! प्लॉटिंग व्यावसायिकाला पट्ट्यानं मारलं, अपहरणाचा प्रयत्न; युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखासह पाच जणांवर FIR

Beed Crime, Ganesh Shirale, Kidnapping Attempt: बीडमध्ये जुन्या आर्थिक वादातून प्लॉटिंग व्यावसायिकाला बेदम मारहाण करून अपहरणाचा प्रयत्न झाल्याप्रकरणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश शिराळे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Jagdish Pansare

Beed Crime: पैशाच्या जुन्या वादातून बीड शहरातील प्लॉटिंग व्यावसायिकाला पट्ट्याने बेदम मारहाण करत दुचाकीवरून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न मध्यरा‍त्री बीड शहरात घडला. या प्रकरणी पोलीसांनी युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखासह पाच जणांवर अपहरण आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीने पोलीस प्रशासन आणि राजकीय नेत्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

पोलीसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही जिल्ह्यात खून अपहरण जिवे मारण्याचा प्रयत्न आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाहीयेत. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. खून, दरोडे, अपहरण आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.

बीड शहरात दोन दिवसांपूर्वी मध्यरा‍त्री असाच एक अपहरणाचा प्रकार उघडकीस आला आणि बीड जिल्हा पुन्हा हादरून गेला. पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेलेल्या एका व्यावसायिकाला पाच ते सहा जणांनी अडवून, बेल्टने बेदम मारहाण करत दुचाकीवर बसवून पळ काढला. या प्रकरणी युवा सेनेचे बीड जिल्हा प्रमुख गणेश गोरख शिराळे, त्यांचे बंधु अक्षय गोरख शिराळे व इतर तीन अनोळखी अशा एकूण ५ जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, प्लॉटिंग व्यावसायिक महावीर हुकूमचंद कोठारी (वय ५१, रा. उत्तमनगर, बीड) हे २२ जुलै रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास जालना रोडवरील हिना पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी जुन्या गाळ्याच्या व्यवहारातील थकीत रकमेच्या वादातून युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश शिराळे, अक्षय शिराळे आणि त्यांच्या तीन सहकार्यांनी कोठारी यांना अडवून वाद घातला. ​

संशयीतांनी कोठारी यांना शिवीगाळ करत चापट बुक्क्यांनी आणि कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. 'तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही 'अशी जिवे मारण्याची धमकी देत त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. मात्र, कोठारी यांनी जाधव पेट्रोल पंपाजवळ प्रसंगावधान राखून संशयीतांच्या तातडीतून स्वत:ची सुटका करून घेतली.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोठारी यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT