Beed: बीडचे माजी जिल्हाधिकारी ईडीच्या रडारवर : तब्बल 300 कोटींच्या घोटाळ्यातील कागदपत्रांची जमवाजमव सुरू

Beed Land Scam, ED Investigation, Avinash Pathak: बीडमधील ३१० कोटींच्या राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळ्यात ईडीने तपासाला वेग दिला आहे. माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक प्रकरणातील कागदपत्रे आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
Beed Land Acquisition Scam; IAS Avinash Pathak
Beed Land Acquisition Scam; IAS Avinash Pathaksarkarnama
Published on
Updated on

Beed Land Scam: राज्यभरात गाजलेल्या बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग जमीन भूसंपादन घोटाळ्यात आता ईडीची एन्ट्री झाली आहे. तीनशे कोटीहून अधिकच्या या भूसंपादन घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती आणि धागेदोरे कुठवर पोहोचलेले आहेत याचा शोध घेण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित घोटाळ्यातील कागदपत्रांची मागणी केल्याची माहिती आहे.

या घोटाळ्यातील तक्रारदार उपजिल्हाधिकारी यांना ईडीने न्यायालयाच्या वतीने समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले होते. या संदर्भात तक्रारदार मुंबईतील ईडीच्या कार्यालयात तीन वेळा जाऊन आल्याचे तसेच जबाब नोंदवल्याची देखील माहिती आहे.

Beed Land Acquisition Scam; IAS Avinash Pathak
Land Scam : विधानसभेत सरकारी जमीन हस्तांतरणाचा मुद्दा नाना पटोलेंनी गाजवला; फडणवीसांना हेरला, आता जिल्हाधिकारी थेट रडारवर

यानंतर या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ईडी कडून गोळा केली जात असून या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत जिल्हास्तरावर पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून नेमका काय तपास केला गेला याची माहिती ईडी कडून घेतली जात आहे.

हा घोटाळा झाला तेव्हा कार्यरत असलेले अनेक अधिकारी हे आता निवृत्त झाले आहेत. त्यांची व सध्या कार्यरत असलेल्या संबंधित प्रकरणाशी निगडित अधिकाऱ्यांची चौकशीही ईडी कडून केली जात असल्याचे समजते.

Beed Land Acquisition Scam; IAS Avinash Pathak
Land Scam : जमीन खरेदी प्रकरणात भाजप आमदारावर ठपका; जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाने खळबळ; बावनकुळेंच्या भूमिकेकडे लक्ष

धुळे सोलापूर महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मावेजा देताना हा घोटाळा समोर आला होता. या घोटाळ्याची एकूण रक्कम ३१० कोटी असून यापैकी ७३ कोटी ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई लाभार्थ्यांना वितरित केल्याची कागदपत्रे दाखवण्यात आली होती. या प्रकरणात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना सात मे रोजी लातूर येथून अटक करण्यात आली होती. सध्या पाठक न्यायालयीन कोठडीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com