AI Image Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime News : वाल्मीक गँगकडून मारहाणीचा दावा करणारा कैदी पलटला की पलटवला? पठाणच्या पत्रातील भाषा, सही अन् अंगठा संशयास्पद

Walmik gang controversy prisoner statement : बीडमध्ये वाल्मीक गँगकडून मारहाणीचा दावा करणाऱ्या कैद्याच्या भूमिकेत बदल. पठाणच्या पत्रातील भाषा, सही आणि अंगठ्याच्या ठशावर संशय व्यक्त.

Jagdish Pansare


Beed Politics News :
बीडच्या कारागृहात वाल्मीक कराड गँगमधील सुदर्शन व प्रतिक घुले यांनी आपल्याला बेदम मारहाण केली, यात माझा हात उखडला, हाड मोडले असा दावा अझहर पठाण नावाच्या कैद्याने केला होता. आता त्याच पठाणची एक आणखी ऑडिओ क्लीप आणि कारागृह अधिक्षकांना लिहिलेलं पत्र व्हायरलं झालं आहे. यात वाल्मीक कराडची बदनामी करण्यासाठी तो कॉल करायला मला जेलमधील कर्मचारी आणि दोन कैद्यांनी भाग पाडल्याचा दावा केला आहे.

मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 2-3 दिवसांत मतदान आहे. तोपर्यंत वाल्मीक कराड आणि गँगची बदनामी करायची, असा दादा खिंडकर याचा निरोप आहे. यासाठी आपल्यावर दबाव आणून हा ऑडिओ तयार करण्यात आला, असा दावा अझहर पठाण याने केला आहे. जेलमधील पोलीस कर्मचारी दीपक पाटील, कैदी सनी आठवले, परभणे यांनी यासाठी आपल्यावर दबाव आणल्याची तक्रारही अझहर पठाण याने पत्रात आणि व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये केले आहे.

हे पत्र आणि व्हायरल ऑडिओ क्लीपची पुष्टी सरकारनामा करत नाही. पण पण व्हायरल झालेलं पत्र, त्यातील शासकीय भाषा, त्याची सही आणि त्याचाच अंगठा या सगळ्या बाबी अत्यंत संशयास्पद आहेत. संबंधित पत्रातील भाषा ही प्रथमदर्शनी पोलिसांची भाषा वाटते. शिवाय अक्षरही शुद्ध आहे. कुठेही काही चूक नाही, खडाखोड नाही. त्याच पत्रात अजहरची सही ही ओळखू न येणाऱ्या अक्षरात आहे. त्याच्याच खाली त्याचा अंगठाही आहे. मग सही करणाऱ्या व्यक्तीने अंगठाही का दिला? असे सवाल विचारले जात आहे.

या दाव्यामुळे अजहर आपल्या दाव्यावरून 24 तासांतच स्वतः पलटला की पलटवला आहे? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या कथित ऑडिओ प्रकरणात कैदी अझहर पठाण याचा बाहुलं म्हणून वापर केला जातोय का? अशीही चर्चा आहे.

सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी जेलमध्ये जबर मारहाण केल्याचा दावा अझहर पठाण याने पहिल्या व्हायरल झालेल्या कथित ऑडियो क्लिपमध्ये केला होता. जेल प्रशासनावर गंभीर आरोप करतानाच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना गोळी घालणार असल्याचे मारहाण करणारे आरोपी बोलत होते, असा दावा केला होता. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर होऊ घातलेल्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा सगळा प्रकार समोर आला होता.

पण या प्रकरणात आज अचानक नवा ट्विस्ट आला. आज व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये अझहर पठाण याने जेलमध्ये थोडा वाद झाला होता. वाद मिटला मात्र सनी आठवले आणि परभणे नामक कैद्याने मला शिकवून हे करायला सांगितल्याचा दावा केला आहे. जेलमधील एक कर्मचारी आहे, त्यांनी दादागिरी करून हे करायला भाग पाडले. असा दावाही अजहरने केला. या मारहाणीचा, ऑडिओ क्लीपचा संबंध थेट मस्साजोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीशी जोडण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT