MLC Election : भाजपकडून आमदारकीसाठी कोल्हापूरच्या नेत्याचा विचार होणार? विधानसभेला बावनकुळेंच्या एका शब्दावर घेतली होती माघार

MLC Election Maharashtra : सुरेश हाळवणकर यांची विधानपरिषद उमेदवारी निश्चित होणार का? कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम नावावर शिक्कामोर्तब होणार. सविस्तर बातमी वाचा.
Suresh Ganpati Halvankar
Suresh Ganpati HalvankarSarkarnama
Published on
Updated on

MLC Election Maharashtra : विधानपरिषदेतील रिक्त होणाऱ्या 9 जागांमुळे राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून पश्चिम महाराष्ट्रातून इचलकरंजीचे माजी आमदार आणि पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे. आज मुंबईत उशिरा होणाऱ्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानपरिषदेतील सध्याच्या नऊ सदस्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी संपत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यामुळे या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे जागांचे वाटप ठरणार आहे.

Suresh Ganpati Halvankar
महापौर झाले अतिकठोर! BLO म्हणून काम करणाऱ्या 5 जणांना घरचा रस्ता; मूळ कामावरूनचं काढलं

महायुतीतील गणितानुसार भाजपला 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 जागा मिळणार आहे. उर्वरित 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

भाजपकडील 5 जागांसाठी अनेक इच्छुकांची नावे समोर येत असली तरी काही नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी आज महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, पंकजा मुंडे, अतुल सावे आणि रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे.

Suresh Ganpati Halvankar
Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा 'मेगा' प्लॅन! पेन्शनची रक्कम होणार दुप्पट?

या बैठकीत उमेदवारांची निवड करताना पक्षाची रणनीती, प्रादेशिक संतुलन आणि राजकीय समीकरणांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे सुरेश हाळवणकर यांच्या नावावर अंतिम निर्णय होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी हाळवणकर यांना थांबवून राहुल आवाडे यांना तिकीट देण्यात आले होते. तेव्हा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेळावा घेऊन विधानपरिषदेचा शब्द दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com