Govind Barge Suicide Case Pooja Gaikwad sarkanama
मराठवाडा

Beed Crime : माजी उपसरपंचाच्या आत्महत्येमागे आर्थिक व्यवहारच, पूजाने घेतलेल्या प्लॉट खरेदीत बर्गे साक्षीदार!

Govind Barge Suicide Case : बीड जिल्ह्यात नुकताच एका माजी उपसरपंचाने स्वत: वर गोळी झोडून घेऊन आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी नर्तकी पूजा गायकवाड हिला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.

Aslam Shanedivan

  1. माजी उपसरपंच बर्गे प्रकरणात ट्विस्ट

  2. पूजाने खरेदी केलेल्या प्लॉट मालमत्तेत बर्गे साक्षीदार

  3. बर्गे प्रकरणात पोलिस तपासात वेग

Beed News : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या आत्महत्येनंतर आता राज्यभर खळबळ उडाली आहे. कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडला ही या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याची फिर्याद बर्गे यांच्या घरच्यांनी दिली असून आता या घटनेत आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात पूजाने घेतलेल्या प्लॉट खरेदीत बर्गे साक्षीदार असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामुळे ही घटना आर्थिक व्यवहारातूनच घडलीय अशी शंका आता उपस्थित होत आहे.

मयत माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचे 21 वर्षीय नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी विवाहबाह्य संबंध होते. यातून पूजाने त्यांच्याकडे पैसा मालमत्तेसाठी तगदा लावला होता. संपत्ती आणि पैसा मिळणे बंद झाल्यानंतर पूजाने बर्गे यांच्यावर दबाव वाढवला होता. त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. याच तणावातून बर्गे यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

या दरम्यान बर्गे यांच्या भाच्याने माझा मामा निर्व्यसनी होता, त्यांच्याकडे पिस्तुलही नव्हते, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला होता. तोच त्यांच्या मित्राने देखील बर्गे पूजाने दिलेल्या धमकीमुळे मानसिकदृष्ट्या खचल्याचेही म्हटले होते.

यानंतर आता या प्रकरणाला तिसऱ्या दिवशी वेगळे वळण लागले असून पोलिसांनी पूजा हिचे आर्थिक व्यवहार आणि तिचे व्यावसायिक संबंधांची कसून चौकशी केली आहे. ज्यात मानेगाव हद्दीत पूजाने खुल्‍या प्लॉट खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे. धक्कादायक माहिती म्हणजे या खरेदी व्यवहारात बर्गे हे साक्षीदार असल्याचे उघड झाले आहे. हा व्यवहार 21 जानेवारी 2025 रोजी वैरागच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये झाला होता.

घटनेच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांनी जामखेड (जि. अहिल्यानगर), पारगाव (ता. वाशी, जि. धाराशिव) आणि संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ येथे चौकशी केली. यावेळी विविध लोकनाट्य कला केंद्रातील केंद्र चालकांसह पूजा हिच्या मैत्रिणींची देखील पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत आणखी काही गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

या दरम्यान काहींच्या चौकशीत काही संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात गेल्या तीन वर्षांमध्ये पूजाचा संपर्क कोणाशी झाला? खरेदी व्यवहारांची चौकशी केली जात आहे.

या प्रकरणात याआधी बर्गे यांच्या आत्महत्येच्या दिवशी पूजा कला केंद्रातच होती हे पारगाव येथील लोकनाट्य कला केंद्रातील सीसीटीव्हीच्या तपासणी उघड झाले आहे. तर पूजाने भावासाठी खरेदी केलेल्या बुलेटमध्ये मात्र बर्गे यांचा काहीच संबंध नसल्याचे समोर आले आहे. कारण ही खरेदीच मुळात तीन वर्षांपूर्वी झाली आहे. याशिवाय घरातील जनावरे देखील पूजाच्या भावानेच स्वतः घेतली आहेत. त्यामुळे बुलेट असो किंवा म्हैस खरेदीसाठी वापरलेले पैसे असो या व्यवहाराचा या प्रकरणाशी संबंध असल्याबाबत पुरावे मिळालेले नाहीत.

FAQs

प्र.1: माजी उपसरपंच बर्गे यांनी आत्महत्या का केली?

उ.: या प्रकरणात विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक व्यवहार असल्याचे समोर आल्याचे समोर आले आहे.

प्र.2: या प्रकरणातील मयत बर्गे कोण आहे?

उ.2: या प्रकरणात आत्महत्या करणारे बर्गे हे माजी उपसरपंच असून त्यांचे नर्तीका पूजाशी संबंध होते.

प्र.3: प्रकरणात नवा ट्विस्ट काय आहे?

उ.3: या प्रकरणात पूजाने खरेदी केलेल्या प्लॉटमध्ये मयत बर्गे हे साक्षीदार असल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT