Police outside the residence in Parli where a 25-year-old youth allegedly committed Death after harassment by an institution head. Sarkarnama
मराठवाडा

Beed Death Case : बीडमध्ये चाललंय काय? आधी सरकारी वकिलाची आत्महत्या अन् आता 25 वर्षीय श्रीनाथ कराडने संपवलं आयुष्य

Beed Death Case : बीडमधील एका तरुणाने संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळी तालुक्यातील दागौळ येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे.

Jagdish Patil

Beed News, 23 Aug : बीडच्या वडवणी न्यायालयात बुधवारी (ता. 20) सरकारी वकील विनायक चंदेल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या आत्महत्ये प्रकरणी चंदेल यांच्या सुसाईट नोट आणि त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार एका न्यायाधीशाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशातच आता बीडमधील एका तरुणाने संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळी तालुक्यातील दागौळ येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी श्रीनाथ गोविंद कराड या 25 वर्षीय तरुणाला पूर्वी कार्यरत असणाऱ्या केज येथील शैक्षणिक संस्था चालकाचालकाच्या त्रासाला कंटाळूनच श्रीनाथ कराडने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे.

श्रीनाथ सध्या वसंत नगर येथील प्राथमिक शाळेत अनुकंपा तत्त्वावर सेवक म्हणून महिन्यापूर्वी कामाला लागला होता. याआधी तो केजमधील एका निवासी शाळेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. मात्र, या ठिकाणी जवळपास 12 वर्षे झाले तरी त्याला संस्थाचालकांनी कायमस्वरूपी करून घेतले नाही.

त्यामुळे तो आर्थिक आणि मानसिक त्रासात असल्याचं बोललं जात आहे. अशातच त्याने काल त्याने नंदाघोळ येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. दरम्यान, या आत्महत्येच्या घटनेचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT