Nagpur Corporation: नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत मोठी अपडेट; इच्छुक नगरसेवकांची प्रतीक्षा संपणार

Nagpur Municipal Corporation Ward Strucutre : नागपूर महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व भावी नगरसेवकांचे प्रभाग रचनेकडे लक्ष लागले आहे. चार सदस्यांच्या प्रभागानुसारच यावेळीसुद्धा निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nagpur Corporation Election
Nagpur Corporation ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नागपूर महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या भावी नगरसेवकांची प्रतीक्षा शनिवारी संपणार आहे. महापालिकेने नव्याने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शनिवारी (ता. 23) महापालिकेच्या प्रभागांचा आराखडा जाहीर केला जाणार असून दुपारी तीन वाजेपासून हरकती व सूचना घेण्यास सुरुवात होणार आहे. हे बघता पोळ्याच्या पाडव्यापासून नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) निवडणुकीचे धुमशान सुरू होणार आहे.

नागपूर महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व भावी नगरसेवकांचे प्रभाग रचनेकडे लक्ष लागले आहे. चार सदस्यांच्या प्रभागानुसारच यावेळीसुद्धा निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी 2017 च्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेत बदल केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. नव्या रचनेत नेमके काय बदल होतात, ते किती व कोणाला फायदेशीर ठरणार याचा अंदाज बांधणे सुरू होणार आहे.

गेल्या साडे तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसाठी नगरविकास विभागाने जारी केलेल्या वेळापत्रकानंतर इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. 2022 पासून नागपूर महापालिकेचा नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला.

तेव्हापासून नागपूर मनपावर ‘प्रशासक राज’ आहे. ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) राज्यभरातील महापालिका निवडणुकीची प्रक्रिया थांबली होती. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण बहाल करून नव्या प्रभागरचनेनुसारच तातडीने निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत.

Nagpur Corporation Election
Ganesh Naik News: फडणवीसांनी ठाण्यात पाऊल ठेवताच गणेश नाईकांना बारा हत्तींचं बळ; म्हणाले,'ठाण्यात भाजपच नंबरचा एक पक्ष...'

आरक्षण बहाल करून नव्या प्रभागरचनेनुसारच तातडीने निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार नागपूर मनपाने प्रभागरचनेचा तयार करून ती नगरविकास विभागाच्या माध्यमातून आयोगाकडे सादर केली. आयोगाने नागपूर मनपाच्या या प्रारूप प्रभाग रचनेस आता मान्यता दिली आहे.

त्यानुसार शनिवारी (ता.23) प्रारूप प्रभाग रचना नागपूर मनपा मुख्यालय आणि मनपाच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर हरकती व सूचना 4 सप्टेंबरपर्यंत मनपा आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय मनपा अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय (मनपाचे 10 ही झोन कार्यालय) येते सादर करता येणार आहे.

Nagpur Corporation Election
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाचा धसका; फडणवीस सरकारचा 'हा' सर्वात मोठा निर्णय

ऑक्टोबरमध्ये होणार अंतिम प्रभाग रचना जाहीर

प्राप्त हरकती आणि सूचनांवर शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून 5 ते 12 सप्टेंबर या काळात सुनावणी घेण्यात येईल. सुनावणी नंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्रभाग रचना अंतिम करून नगर विभागास १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान मनपा नगर विकास विभागाकडे सादर करेल.

विभाग प्राधिकृत अधिकाऱ्याने अंतिम केलेली प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान सादर करेल. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे 3 ते 6 ऑक्टोबरदरम्यान प्रसिद्ध करेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com