Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
मराठवाडा

अजितदादांना शिवसेना काळे झेंडे दाखविणार ; बीडमध्ये अंतर्गत वाद उफाळला

सरकारनामा ब्युरो

बीड : महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये बीडमध्ये धूसफूस सुरु आहे. विकास कामावरुन अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद विकास कामांवरुन चव्हाट्यावर आला आहे.

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या (Shiv Sena) माजी जिल्हाध्यक्षांनी थेट विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून, मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी बीड मतदारसंघातील कामांना विशेष मंजुरी दिलेली आहे.

मात्र, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कामांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून आडकाठी आणली जात असल्याचा आरोप करण्यात आली आहे. यामुळे विकास कामावरून बीडमध्ये शिवसेना -राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

''हा प्रकार न थांबविल्यास बीड जिल्ह्यात विकास कामाच्या उद्धघाटन दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवणार आहोत. जर उद्धघाटन ऑनलाईन असेल तर प्रतिकात्मक पुतळा उभारून, निषेध व्यक्त करणार आहोत,'' असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी स्थापन होऊन दोन वर्षे पूर्ण झाली. राज्याच्या हिताच्या व सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी आघाडीची स्थापना करण्यात आली. विकासाला गती मिळावी म्हणून समान विकास कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. परंतु, याचा बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला विसर पडला आहे. शिवसेनेच्या मंत्री आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने आलेल्या विकासकामांना राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व आडकाठी आणत आहे. याबाबत वरिष्ठांना आपण कळविले आहे, असे सचिन मुळूक यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT