Mumbai News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जिल्हा पोलिस दल आणि जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे.
पिस्तूल परवानाधारकांची छाननी करताना पुन्हा 127 जणांचे परवाना रद्द करण्यात आले आहे. आतापर्यंत 310 परवाना रद्द झाले असून आणखी आकडा वाढणार आहे. अजून कारवाई सुरू राहणार असून, जवळपास 500 च्यावर आकडा जाईल, असे सांगितले जात आहे.
बीड (BEED) जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने पाठपुरावा करताना अनेक खुलासे केले. पिस्तूल परवाना खैरात असल्यासारखे वाटण्यात आले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांकडे देखील परवाना होते. यातून काही पिस्तुलाबरोबर खेळतानाचे समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल करायचे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि बीडमधील गुन्हेगारी (Crime) जगत उघडकीस आले. यानंतर जिल्हा पोलिस दल आणि जिल्हाधिकारी प्रशासनाने पिस्तूल परवानाधारकांची छाननी सुरू केली. यात आतापर्यंत 310 जणांचे परवाना रद्द झाले आहे. बीड जिल्ह्यात एकूण 1 हजार 281 पिस्तूल परवानाधारक आहे.
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 232 जणांची पिस्तूल परवाना रद्द करण्यात आली आहेत. आता पुन्हा 127 जणांचे परवाना रद्द करण्यात आलेत. ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार आहे. तो ५०० च्या पुढे जाईल, असे सांगितले जात आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यास सुरवात केली आहे. मकोकानुसार प्रस्ताव तयार करणे, प्रतिबंधात्मक नोटीसा बजावणे, अवैध वाळू, राख वाहतुकीविरोधात कारवाई सुरू केली आहे.
बीडमधील शस्त्र परवानांचे प्रकरणानंतर राज्यात अशी मोहीम राबवली जाणार आहे. गृहविभागाकडून पोलिस आयुक्त, अधीक्षक यांना तशा सूचना केल्या आहेत. अनावश्यक असलेल्यांकडील शस्त्र परवाने रद्द करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात ही मोहीम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.