Suresh Dhas : आमदार धस यांच्या अडचणी वाढल्या; सूर्यवंशी मृत्यूप्रकरणातील विधान भोवणार

Bhim Army Atrocity case Beed Ashti BJP MLA Suresh Dhas Parbhani Somnath Suryavanshi death case : भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावर भीमी आर्मीने कारवाईची मागणी केली आहे.
Suresh Dhas 2
Suresh Dhas 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस चांगलेच अडचणीत आले आहेत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणात पोलिसांवर गु्न्हे दाखल व्हावेत, असा आग्रह धरू नका, अशी सुरेश धस यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधक चांगले आक्रमक झाले आहेत.

आमदार धस यांच्या दुटप्पीपणाच्या भूमिकावर विरोधकांकडून जोरदार टीका होत असतानाच भीम आर्मीने मात्र वेगळीच भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार धस यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे हे आमदार धस यांच्या भूमिकेवर चांगलेच आक्रमक झाले आहे. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात आंबेडकर आनुयायींनी काढलेला आमचा लाँग चिरडला. हे एक मोठं षडयंत्र आहे. यामुळे आमच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. सुरेश धस यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अशोक कांबळे यांनी केली.

Suresh Dhas 2
Sanjay Raut On Anna Hazare : मोदी, शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्टाचार, अण्णा हजारेंनी साधी 'कूस'ही बदलली नाही; खासदार राऊतांची टोलेबाजी

अशोक कांबळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून कारवाई करावी, अशी मागणी केली. आमदार धस यांनी आंदोलन चिरडून चुकीचे केले आहे. धस यांना आंबेडकरी जनता सोडणार नाही. धस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा देखील इशारा अशोक कांबळे यांनी दिला आहे.

Suresh Dhas 2
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा महायुतीच्या बैठकांना अनुपस्थित राहण्याचा धडाका...

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येत न्याय मिळावा यासाठी आंबेडकर अनुयायींनी मुंबई मंत्रालयावर लाँग मार्च काढल होता. परभणीतून नाशिकपर्यंत सुमारे 400 किलोमीटरपर्यंत हा लाँग मार्च आला होता. परंतु भाजप आमदार सुरेश धस यांनी या घटनेतील पोलिसांना माफ करावी अशी मागणी केली. त्यामुळे आंदोलनातील हवाच निघून गेली. यावरून आमदार धस यांच्या या भूमिकावर आमदार जितेंद्र आव्हाड, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली होती.

आमदार धस यांच्या या भूमिकेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टाकी केली. तर काही गोष्टींमध्ये मोठ्या मनाने माफ करायचे असते, असा आमदार धस यांचा व्हिडिओ आमदार आव्हाडांनी ट्विट करत, ‘मग याच न्यायाने वाल्मिक कराडलाही माफ करायचं का?’, असा सवाल केला. आमदार आव्हाड यांच्या या व्हिडिओवर आमदार धस यांनी माझा व्हिडिओ तोडूनमोडून दाखवण्यात आल्याचा दावा केला आहे.

आमदार धस यांच्यावर विरोधकांकडून टीका होत असतानाच, भीम आर्मीने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार धस यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. भीम आर्मीने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे त्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याने आमदार धस यांच्या अडचणी पुढील काळात वाढू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com