Therla Beed School Collapse: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील थेरला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जीर्ण वर्गखोलीची भिंत आणि छत मध्यरात्री कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे तब्बल २३० विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात बचावला.
पाटोदा तालुक्यातील थेरला येथील १९६५ साली बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची जीर्ण झालेली वर्गखोली मध्यरात्री अचानक कोसळली. भिंत आणि छत जमीनदोस्त झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने घटना मध्यरात्री घडली आणि शाळेला सुट्टी असल्याने २३० विद्यार्थ्यांचा जीव वाचला.
शाळेची इमारत धोकादायक झाल्याबाबत मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी शाळेचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन वर्गखोल्यांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. बीड जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था धोकादायक असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.