Beed Shivsena Sarkarnama
मराठवाडा

Beed : टक्केवारीत गुंग आमदारांनी निष्क्रीय बंधूला उपनगराध्यक्ष केले..

आमदाराने स्वतःचा भाऊ, आई यांच्यासाठी कार्यकर्त्याला बाजूला केलं. टक्केवारीसाठी कार्यकर्त्यांचा मानसिक छळ केला. (Beed News)

सरकारनामा ब्युरो

बीड : आम्हाला लहान पणापासून त्यांचे गुण माहीत आहेत. आमदार झाले की जणू आकाशाला शिवल्याची भावना आमदार संदिप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांची झाली. जवळच्या निष्ठावंत लोकांना बाजूला करायला सुरुवात करत सच्चा कार्यकर्त्याला मोठं करण्याऐवजी स्वतःच्या निष्क्रिय बंधुला उपाध्यक्ष केलं, असा टोला डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना लगावला. (Beed)

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर घुमरे, पालिकेचे माजी गटनेते फारुक पटेल, माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, प्रेमचंद लोढा व भिमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष नितीन लोढा यांनी सोमवारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Marathwada) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप आदींसह पदाधिकारी उपस्थित हेाते.

सुरुवातीला भाषणात डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आमदार संदीप क्षीरसागरांवर टिकास्त्र सोडले. आमदाराने स्वतःचा भाऊ, आई यांच्यासाठी कार्यकर्त्याला बाजूला केलं. टक्केवारीसाठी कार्यकर्त्यांचा मानसिक छळ केला. यांना अडीच वर्षात स्वतःच्या बंधुसहित एका नगरसेवकाला सांभाळता आलं नाही. केंद्र आणि नगर पालिकेच्या माध्यमातून आणल्या जाणाऱ्या कामांचेआमदार उदघाटन करत आहेत.

आमदाराने एकही काम केलं नाही, केवळ श्रेय घेत आहेत. राजुरी ते बीड रस्ता कंबरडे मोडणारा ठरत आहे. कोणतेही काम टक्केवारी शिवाय पुढं जात नाहीये, अशी टीकाही त्यांनी केली. तहसील असो की बांधकाम खाते प्रत्येक ठिकाणी टक्केवारी साठी लोकं ठेवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केले. ब्लॅकचे धंदे चालतात ते सुसाट आहेत. वाळू असो की रेशन सगळीकडे आजी - माजी आमदार पार्टनर आहेत. प्लॉटिंग करणाऱ्यांना सुद्धा त्रास दिला जातोय असेही डॉ. क्षीरसागर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT