Petrol-Diesel Inflation
Petrol-Diesel InflationSarkarnama

Price Hike : सात दिवसात सहाव्यांदा इंधन दरवाढ; पेट्रोल-डिझेल चार रुपयांनी वाढले

कच्च्या तेलाचे दर फेब्रुवारीमध्ये १४० डॉलर प्रतिबॅरल इतक्या उचांकीवर पोहोचले होते. ते आता घसरून १०३ डॉलर प्रतिबॅरल झाले आहे. (Petrol-Diesel)

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर २६.४२ टक्क्यांनी घटले असूनही देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. (Petrol-Diesel) सोमवारी पेट्रोल ३० पैशांनी, तर डिझेल ३५ पैशांनी महागले. (Dehli) सोमवारच्या इंधन दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल तब्बल ११४.०८ रुपये, तर डिझेल ९८.४८ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. मागील सात दिवसांत तेल वितरक कंपन्यांनी सहाव्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. (Maharashtra)

एका आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर लिटरमागे ४ रुपयांनी वधारले. दिल्लीत सोमवारी पेट्रोल ९९.४१ रुपये प्रति लिटरवर पोहोचले असून डिझेल ९०.७७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०८.८५ रुपयांवर पोहेचले असून डिझेल ९३.९२ रुपयांवर पोहोचले आहे. भोपाळ, जयपूरमध्ये पेट्रोल १११ रुपये प्रतिलिटरवर गेले आहे.

तर हैदराबादमध्ये पेट्रोल ११२.७१ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले असून डिझेल ९९.०७ रुपये झाले आहे. कच्च्या तेलाचे दर फेब्रुवारीमध्ये १४० डॉलर प्रतिबॅरल इतक्या उचांकीवर पोहोचले होते. ते आता घसरून १०३ डॉलर प्रतिबॅरल झाले आहे.

असे असतानाही देशात तेल वितरक कंपन्यांनी सहा वेळा इंधनाचे दर वाढवले आहेत. मूडीजच्या मते इंधनाच्या सतत होणाऱ्या दरवाढीचे संकेत म्हणजे पेट्रोल-डिझेलचे दर एकदम न वाढवता ते टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येतील.

Petrol-Diesel Inflation
VBA : रमजान ईद नंतर हिजाब गर्ल मुस्कानचा सत्कार करणार

आठवडाभरात इंधन महागाईचा भडका

२२ मार्च - घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागले

२३ मार्च - पेट्रोल डिझेल ८० पैशांनी महागले

२५ मार्च - पेट्रोल डिझेल दुसऱ्यांदा ८० पैशांनी महागले

२६ मार्च - पेट्रोल डिझेल तिसऱ्यांदा ८० पैशांनी महागले

२७ मार्च - पेट्रोल ५० पैसे, तर डिझेल ५५ पैशांनी महागले

२८ मार्च - पेट्रोल ३० पैसे, तर डिझेल ३५ पैशांनी महागले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com