OBC leader TP Munde  Sarkarnama
मराठवाडा

Beed crime news : 'खोक्या'कडून सुरेश धसांना डब्बे भर भरून हरणांचे मांस जायचे; मुंडेंच्या आरोपांनी खळबळ

OBC leader TP Munde Beed gangster Satish Bhosale deer meat BJP MLA Suresh Dhas : बीडमधील गुंडागर्दी करणारा सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांना हरणांचे मांस जायचे, असा गंभीर आरोप ओबीसी नेते टी. पी. मुंडे यांनी केला.

Pradeep Pendhare

Maharashtra political news : सतीश भोसले ऊर्फ 'खोक्या'भाई याच्या करारनाम्यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांचे पाय खोलात सापडले आहे. 'खोक्या'भाईचे मारहाणीचे व्हिडिओ, गुंडागर्दी, सावकारकी अन् वन्यप्राण्यांच्या शिकारांसाठी परिसरातील दहशतीच्या किस्स्यांना तोंड फुटले आहे.

शिरूर तालुक्यातील वनपरिसरात त्याने 200पेक्षा जास्त वन्यप्रमाण्यांची शिकारी केल्या असून, हरणांची मोठ्याप्रमाणात शिकार केल्याच्या तक्रारी समोर आल्यात. यातच हरणांचे मांस भाजप आमदार सुरेश धस यांना डब्बे भर भरून जात होते, असा गंभीर आरोप ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन आमदार धस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दडपशाहीची तक्रार करणार असल्याचेही मुंडे यांनी म्हटले.

सतीश भोसले हा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता असल्याने त्याची शिरूर परिसरात मोठी दहशत आहे. वन्यप्राण्यांची मोठी शिकार करत असल्याचे पुढे आले आहे. त्याला विरोध करणार्‍यांना सतीश भोसले आणि त्याच्या गँगकडून मारहाण होत होती. आमदार धस यांचा कार्यकर्ता असल्याने त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई झालेली नाही.

सतीश भोसले याने शिरूरमधील वन्यपरिसरात मोठ्याप्रमाणात प्राण्यांची शिकार केली आहे. हरिण, काळवीट, ससे, मोर यांची शिकार झाली आहे. या मांस डब्बे भरून-भरून सुरेश धसांना जायचे. धस यांचाच अभय असल्याने सतीश भोसले याच्यावर कारवाई झालेली नाही.

सुरेश धसांविरोधात मोर्चा काढणार

शिरूर परिसरात सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाईची असलेल्या दहशतीविरोधात मंगळवारी गावकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे टीपी मुंडे यांनी सांगितले. भाजप आमदार सुरेश धस आणि सतीश भोसले उर्फ खोक्याभाई विरोधात रविवारी शिरूरमध्ये भव्य मोर्चा काढण्याचा इशारा मुंडे यांनी दिला.

हे तर आकाचे आकाच...

वन्यप्राण्यांची शिकार आणि त्याच्या मांस तस्करीमध्ये गुन्हे दाखल होऊन, त्यात भाजप आमदार सुरेश धस सहआरोपी झाला पाहिजे. हे दुसऱ्यांना आका म्हणतात, पण हे तर आकाचे आका आहेत. वाल्मिक कराडपेक्षा जास्त गुन्हेगार सुरेश धसांकडे आहेत. वन्य प्राण्यांची तस्करी करणे याच्यावर बंदी असताना, अशा प्रकाराच्या लोकांच्या माध्यमातून तस्करी करायला लावणे, हा गुन्हाच आहे. त्यामुळे पहिल्यांदा सुरेश धसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT