
Narendra Modi Women Day Wishes : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'एक्स' आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक दिवस, अशा महिलांना समर्पित केला आहे, ज्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे.
पीएम मोदींनी त्यांच्या समाज माध्यमांची जबाबदारी महिलांकडे देण्याचा मोठा निर्णय जाहीर केला.
पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा देताना म्हटले, 'महिला दिनानिमित्त महिला शक्तीला सलाम करतो. सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच काम केले आहे. सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांमध्ये ते दिसले आहे. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्रिया आज माझ्या समाज माध्यमांवरील खात्यांचे व्यवस्थापन करतील!'
पीएम मोदी यांनी, 'सर्व ज्ञान, हे देवीच्या विविध रूपांची अभिव्यक्ती आहे आणि ते जगातील सर्व महिला शक्तींमध्ये देखील प्रतिबिंबित होते, असे म्हटले आहे. तसेच आपल्या संस्कृतीत मुलींचा आदर सर्वोपरी आहे. या शतकात जागतिक विकासात महिलांचा सहभाग हा एक मोठा घटक असणार आहे. एखादा देश (India) आणि समाज महिलांना जितका अधिक सहभाग देईल तितक्या वेगाने वाढेल. आज भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे युग आहे,' असे मोदी यांनी म्हटले.
"महिला धोरण, निष्ठा, निर्णयक्षमता आणि नेतृत्व यांचे प्रतिबिंब आहेत. आज भारत महिलांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन योजना आणि निर्णय घेत आहे. देशाची नवी शक्ती ही विकसित भारताचा संकल्प साध्य करण्याची सर्वात मोठी हमी आहे. म्हणून यावेळी महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून अदम्य स्त्रीशक्तीला साजरी करूया, त्यांचा आदर करूया आणि अभिवादन करूया," असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पीएम मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात सांगितले होते की, यावेळी महिला दिनी त्यांच्या सोशल अकाउंटची जबाबदारी महिलांकडे असणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिलांचे स्मरण केले. महिला दिनाच्या या विशेष प्रसंगी, मी माझे 'X', 'Instagram', सारखे सोशल मीडिया खाते एका दिवसासाठी देशातील काही प्रेरणादायी महिलांना सुपूर्द करणार आहे, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.