Beed SSC exam copy scam Sarkarnama
मराठवाडा

Beed SSC exam copy scam : कॉपीचा नवा फंडा: ‘बीड पॅटर्न’कडून परीक्षा व्यवस्थेची पोलखोल! केंद्रावरील पर्यवेक्षकांसह शिक्षकांचाही हात?

Video goes viral alleging answer sheets were supplied to SSC students through water buckets at a Georai exam centre in Beed : बीड जिल्ह्यातील जातेगाव इथल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावरील काॅपीच्या प्रकाराने शिक्षण विभागाचे धाबे दणाणले आहेत.

Pradeep Pendhare

10th board exam copy supply case : शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागाने राज्यात, दहावी अन् बारावीच्या परीक्षा काॅपी मुक्त करण्याच्या निर्धार केला होता. त्याला शिक्षकांकडून हरताळ फासला जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत.

आतापर्यंत झालेल्या काॅपी केसमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, शिपाई, पर्यवेक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी ते गटशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आढळला आहे. आता बीडमधील 'काॅपी पॅटर्न'ने या सर्वांवर मात केली आहे. काॅपी पुरवण्याचा, व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच, शिक्षण विभाग चांगलाच हादरलाय.

बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यातील जातेगाव इथल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर हिंदीच्या पेपरला परीक्षार्थी विद्यार्थ्यांना झेरॉक्स काढून उत्तर पुरवण्यात आली. शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तयार करून त्याचे झेरॉक्स काढण्यात आली आणि त्यानंतर थेट विद्यार्थ्यांना प्रत्येक हॉलवर ही झेरॉक्स वाटण्यात आली.

काॅपी पुरवण्यामागे प्रश्न आणि उत्तरांची मालिका होती. उत्तरपत्रिका वर्गावर परीक्षार्थींपर्यंत (SSC Exam) पोहोचवण्याचा फंडा पाहिल्यास, धक्काच बसतो. यासाठी केंद्रावरील सीसीटीव्ही देखील बंद करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे केंद्रावरील काॅपीचा प्रकार सुरू आहे ही बाब रेकाॅर्डवरच आली नाही.

परीक्षार्थींना काॅपी पुरवण्यासाठी बादलीचा वापर करण्यात आला. परीक्षार्थींना बाकावरून उठण्याची मुभा नसते. त्यांना बाकावर पिण्याचा पाणी पुरवले जाते. यासाठी विद्यार्थ्यांची नेमणूक केली जाते. याच पाणी पुरवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वापर करत, उत्तर परीक्षार्थांनी पुरवण्यात आल्या.

यासाठी बादलाची खुबीने वापर केला. बादलीत पिण्याचे पाण्याऐवजी त्यात लिहिलेली उत्तर असायची. बादलीतून वर्गावर पाणी नेण्याचा भास केला जायचा. बादली घेऊन जाणारा विद्यार्थी देखील तसा अभिनय करायचा. वर्गापर्यंत पोहोचवल्यावर तिथं परीक्षार्थींना बादलीतून उत्तर काढून दिली जायची. परीक्षार्थांनी उत्तर लिहिल्यानंतर तो कागद पुन्हा बादलीत गोळा केला जायचा.

हा काॅपीचा बीड पॅटर्नचा, व्हिडिओ रेकाॅर्ड तयार झाला आहे. तो आता समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून, त्यावर चर्चांना तोंड फुटलं आहे. यात कारवाईची मागणी होतं आहे. कारवाई झाल्यास अख्खं परीक्षा केंद्रावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाईल. शिक्षण विभागात आता नेमकं कोणती कारवाई करतोय, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT