

Baba Siddique murder case : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे प्रमुख कारण मुंबई पोलिसांनी समोर आणलं आहे. मुंबई पोलिसांनी न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
'बाबा सिद्दीकी यांची हत्यामागे 'बिल्डर लाॅबी' नसून, बिश्नोई टोळीला महाराष्ट्रात विस्तारासाठी दहशत, खंडणी गोळा करणे हाच प्रमुख उद्देश होता,' असे मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या रात्री वांद्रे (पूर्व) इथं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या झाली. या हत्येनंतर मुंबई शहरासह देशात खळबळ उडाली होती. मुंबई सुरक्षित राहिली नाही, अशी चर्चा सुरू असतानाच या हत्येमागे बिश्नोई टोळी असल्याचं समोर आलं.
मुंबई (Mumbai) पोलिसांनी आतापर्यंत, या प्रकरणात अनेक आरोपींना अटक केली. पोलिसांनी तपासात पुढे, बिश्नोई टोळीच्या सहभागावर शिक्कामोर्तब केलं. बाबा सिद्दिकी यांची हत्या, ही अभिनेता सलमान खानसोबत असलेल्या जवळीकमुळे बिष्णोई टोळीने केल्याची चर्चा आहे. पण सिद्दिकी यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात 'बिल्डर लॉबी'वर संशय व्यक्त केला होता.
परंतु, बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केला. मुंबई पोलिसांचा तपास अपूर्ण असून, या तपासाता बिल्डर लाॅबीची चौकशी झाली नाही, असा आरोप केला. वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये रस असलेल्या काही 'वजनदार' बिल्डरांची चौकशीची मागणी केली. शहझीन सिद्दीकी यांची ही याचिका म्हणजे, मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय होता.
मुंबई पोलिसांनी संशयाला जागा नको म्हणून, या याचिकेला उत्तर देताना, सीआयडीचे सहाय्यक पोलिस आयुक्त किशोरकुमार शिंदे यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. यात पोलिसांच्या तपासादरम्यान कोणत्याही बिल्डरचा किंवा विकासकाचा या गुन्ह्याशी संबंध आढळला नाही. तसे पुरावे नाहीत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील (SRA) वादातून ही हत्या झाल्याचा दावा देखील पोलिसांनी फेटाळला.
शहझीन सिद्दीकी यांच्या याचिकेतील आरोप 'तथ्यहीन' असून, पोलिस यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी हे आरोप केले जात आहेत, हे सांगताना ही हत्या अनमोल बिश्नोईच्या टोळीने केली आहे. दहशत निर्माण करणे, गुन्हेगारी विश्वात वर्चस्व प्रस्थापित करणे आणि खंडणी वसूल करणे हाच या हत्येमागचा मुख्य उद्देश होता, असे ठामपणे प्रतिज्ञापत्रात म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.