Beed Police .jpg Sarkarnama
मराठवाडा

Beed DJ News : 'आयजीं'च्या बीड दौऱ्यात डीजेचा दणदणाट भोवला; पोलीस निरीक्षक विनोद घोळवेंची तडकाफडकी उचलबांगडी

Beed Police Inspector Vinod Gholve News: आयजींच्या दौऱ्यावेळी गाजावाजा होत असताना बीड शहर हद्दीत डीजे सुरु असणे आणि प्रभारी अधिकाऱ्यालाच त्याची माहिती नसणे, हे अत्यंत गंभीर असल्याचे सांगत अधीक्षकांनी घोळवेंची उचलबांगडी केली.

Jagdish Pansare

Beed News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेमुक्त सण साजरा करण्याचे आदेश असताना, बीड शहरात डीजे वाजवण्यास परवानगी देणे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा बीड दौऱ्यावर असतानाच शहर ठाण्याच्या हद्दीत डीजेचा आवाज घुमला. या बेफिकिरीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी घोळवे यांची थेट नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) तडकाफडकी रवानगी केली आहे.

आयजींच्या दौऱ्यावेळी गाजावाजा होत असताना बीड शहर हद्दीत डीजे सुरु असणे आणि प्रभारी अधिकाऱ्यालाच त्याची माहिती नसणे, हे अत्यंत गंभीर असल्याचे सांगत अधीक्षकांनी घोळवेंची उचलबांगडी केली. आता बीड शहर पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार शिवाजीनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ​

नवीन आलेल्या साऊंड सिस्टीमची घरगुती पूजा करण्यासाठी नगरपालिकेकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणल्यानंतरच आपण परवानगी दिली होती, असा दावा पोलिस निरीक्षक विनोद घोळवे यांनी केला आहे. मात्र, एसपी काँवत यांच्या या दणक्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे सकाळीच झालेल्या आढावा बैठकीत डीजे बंदीची अंमलबजावणी कठोरपणे करण्यावर भर देण्यात आला होता. तर सायंकाळीच घोळवे यांनी डीजे वाजवण्यास परवानगी दिली.

गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजे (DJ) आणि डॉल्बीच्या वापरावरून महाराष्ट्रात, विशेषतः पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ध्वनिप्रदूषण आणि नागरιकांच्या तक्रारींमुळे हा वाद निर्माण झाला आहे

उच्च डेसिबलच्या डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास टाळण्यासाठी पुण्यात 'डीजे मुक्त पुणे'ची मागणी होत आहे. डीजे आणि लाऊडस्पीकर बंदीची मागणी करणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात नुकताच हल्ला झाला, ज्यामुळे हा वाद अधिकच वाढला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT