

धनंजय शेटे
Marathwada News : लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षांच्या तारखामध्ये होणारे वारंवार बदल आणि शेतीच्या नापिकातून आलेली आर्थिक अडचण या कारणांमुळे प्रथमेश देशमुखचा बळी गेला, असा आरोप सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर केला.
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश देशमुख वय (२५ ) या विध्यार्थीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या घटनेने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आर्थिक प्रश्नाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. मुलगा अधिकारी होऊन गावी परतावे अशी कुटुंबाचे इच्छा व स्वप्न होते.
मात्र, एमपीएससीच्या परीक्षेतील अनिश्चितता, कथित पेपरफुटी आणि त्यातून निर्माण झालेला आर्थिक व मानसिक ताण तणावाचा प्रथमेश हा बळी ठरला, असा अशी टीका दिपके यांनी केली. गतवर्षी महापुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेले होते. यंदा पावसाअभावी सोयाबीनचे पीक डोळ्या देखत करपून जात असल्याचे पंधरा दिवसांपूर्वी गावाकडे आलेल्या प्रथमेश देशमुखने पिकाची पाहणी केली.
या पार्श्वभूमीवर प्रथमेशने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगीतले जाते. आज गुरुवारी दि. १० अभिजीत दीपके यांनी प्रथमेशच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मोठी स्वप्ने घेऊन पुण्यासारख्या शहरात येतात. घरापासून दूर राहून भाडे, मेस, पुस्तके आणि अभ्यासाचा खर्च भागवत ते परीक्षेची तयारी करतात.
मात्र, परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी किंवा निकालाला होणारा विलंब यामुळे त्यांच्या मानसिक आणि आर्थिक अडचणी वाढतात. प्रथमेशच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. अशा परिस्थितीमुळे आणखी किती विद्यार्थ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागणार ? असा संतप्त सवालही दीपक यांनी उपस्थित केला.
एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता आपल्या कुटुंबाचा आणि भवितव्याचा विचार करावा, असे आवाहन दीपके यांनी या भेटीत केले. प्रथमेशच्या मृत्यूमुळे एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील आर्थिक-मानसिक ताणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
खासापूर येथील एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने पेपरफुटी शेतातील नापिकी कर्जाच्या ओझ्यामुळे पुण्यात आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना राज्य सरकारच्या अपयशामुळे घडली आहे.
धाराशिवचे पालकमंत्री हे झेंडा मंत्री आहेत ते 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 17 सप्टेंबर रोजीच जिल्ह्यात येतात. संकट काळात जिल्हा आठवत नसल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांनी खासापूर येथील प्रथमेश देशमुख कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटी दरम्यान केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.