Beed, 04 June : राज्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत. त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर पाचव्या फेरीअखेर तब्बल 8000 मतांनी आघाडी घेतली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. त्यामुळे बीडमध्ये काय होते, याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चौथ्या फेरीअखेर भाजपच्या पंकजा मुंडे यांना 92 हजार 325 मते मिळाली आहेत, तर बजरंग सोनवणे 1 लाख 01 हजार 281 मते मिळाली आहेत. त्यामुळे बजरंग सोनवणे हे 8956 मतांनी आघाडीवर होते. मात्र, पाचव्या फेरीअखेर बजरंग सोनवणे यांची आघाडी कमी झाली आहे. त्यांची आघाडी कायम असली तर सुमारे एक हजार मते कमी झाली आहेत.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याची तक्रार बजरंग सोनवणे यांनी केली होती. आमदार रोहित पवार यांनीही व्हिडिओ ट्विट करत बोगस मतदान झाल्याचा आरोप धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.