Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : सोलापूरमधून प्रणिती शिंदे दुसऱ्या फेरीअखेर 17256 मतांनी आघाडीवर

Solapur Loksabh Constituency : सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढाई झाली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीपासूनच प्रणिती शिंदे ह्या आघाडीवर आहेत.
Praniti Shinde
Praniti Shindesarkarnam

Solapur, 04 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे ह्या 17256 मतांनी आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे भाजपचे बालेकिल्ले असललेल्या अक्लकोट, पंढरपूर-मंगळेवढा आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघासह सोलापूर शहर मध्य आणि मोहोळ मतदारसंघातही प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.

सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढाई झाली होती. सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीपासूनच प्रणिती शिंदे ह्या आघाडीवर आहेत. यात पहिल्या दोन फेरीअखेर प्रणिती शिंदे यांनी 17256 मतांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रणिती शिंदे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे यांना 29472 मते मिळाली होती. भाजपचे राम सातपुते यांना 28 हजार 263 मते मिळाली होती. पहिल्या फेरीअखेर 1209 मतांनी शिंदे यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे पहिल्या फेरीपासूनच शिंदे यांनी आगेकूच केली आहे.

दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 64,389 मते मिळाली आहेत, भाजपचे राम सातपुते यांना 47,133 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य हे 17256 एवढे झाले आहे. अक्लकोट, शहर मध्य, मोहोळ, पंढरपूर-मंगळेवढा आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनी मोठा लीड घेतला आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेरीअखेर विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तरमधूनही प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या. मात्र पुढे बदल होत गेला.

Praniti Shinde
Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE : माढ्यातून तिसऱ्या फेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील 9000 मतांनी आघाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com