Beed Loksabha  Sarkarnama
मराठवाडा

Beed Lok Sabha Voting : बीडमध्ये पहिल्या चार तासांत 16.62 टक्के मतदान

Vijaykumar Dudhale

Beed, 13 May : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 पर्यंत 16.62 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान हे केज विधानसभा मतदारसंघात झाले असून ते 21.55 टक्के झाले आहे. सर्वात कमी मतदान हे आष्टी विधानसभा मतदारसंघात झाले असून ते 10.95 टक्के एवढे नोंदले गेले आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण, मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू हा मराठवाड्यातील बीड आणि जालना या भागातच होता. त्यामुळे या भागात मतदान कशा पद्धतीने होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड लोकसभा मतदासंघातील मतदान केंद्रांवर सकाळी सातपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेऊन सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले, त्यामुळेच केज विधानसभा मतदारसंघासारख्या ठिकाणी सर्वाधिक मतदान झाल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात सर्वांत कमी मतदान हे आष्ट विधानसभा मतदारसंघात 10.95 टक्के एवढे नोंदले गेले आहे.

बीड लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 16.62% मतदान झाले आहे. यात गेवराई विधानसभा मतदारसंघात 17.31 टक्के, माजलगाव विधानसभा मतदारसंघात 17.20 टक्के, बीड विधानसभा मतदार संघात 14.20 टक्के, आष्टी विधानसभा मतदारसंघात 10.95 टक्के, केज विधानसभा मतदारसंघात 21.55 टक्के, तर परळी विधानसभा मतदारसंघात 18.77 टक्के मतदान झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT