Sambhajinagar Voting : छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी अकरापर्यंत 19.53 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024 : या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरची जनता कोणाला दिल्लीला पाठविणार, यासाठी आज होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
 Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji NagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 13 May : लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघात सकाळी सातपासून सर्वच २०४० मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात आपले मतदान उरकून घ्यावे, या हेतूने मतदानाला सुरुवात होण्याच्या पूर्वीपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पहिल्या चार तासांत सकाळी ११ पर्यंत जिल्ह्यात १९.५३ टक्के मतदान झाले.

छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून पीएमएस (पोलिंग माॅनिटरींग सिस्टीम ) २४ ॲपद्वारे व वेबकास्टींगद्वारे मतदानावर लक्ष ठेवून आहेत. पहिल्या चार तासांत सकाळी ११ पर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९.५३ टक्के मतदान झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Chhatrapati Sambhaji Nagar
Hatkanangale Lok Sabha : मतदार यादीतून नावे गायब; हातकणंगलेतील मतदार प्रशासनाला खेचणार कोर्टात

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदार संघाच्या तुलनेमध्ये मतदानाची (Voting) गती वाढलेली दिसत असून पूर्व मध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजे 22.61 टक्के मतदान झाले.

पहिल्या चार तासांत सकाळी ११ पर्यंत औरंगाबाद मध्य मतदारसंघात २०.४१ टक्के मतदान झाले आहे. औरंगाबाद पश्चिम मध्ये १९.७६, औरंगाबाद पूर्व मध्ये २२.६१, गंगापूरमध्ये १६.९४, वैजापूर येथे १७.५१ आणि कन्नड विधानसभा मतदारसंघांमध्ये १९.८ टक्के मतदान झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), तर शिंदे गटाकडून राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) निवडणूक लढवत आहेत. याशिवाय एमआयएम पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलिल (Imtiaz Jalil) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता या निवडणुकीत संभाजीनगरची जनता कोणाला दिल्लीला पाठविणार, यासाठी आज होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Vijay Dudhale

 Chhatrapati Sambhaji Nagar
Thane Lok Sabha : ठाणे लोकसभा भाजपनेच लढावा, अशी फडणवीसांची इच्छा होती; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com