Bajrang Sonwane, Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonwane Winning Factor : बजरंग सोनवणेंच्या विजयाच्या आकड्यांचा नेमका खेळ काय? कुणाला किती मते...

Beed Lok Sabha Election Result : मतमोजणीनंतर उशिरा बजरंग सोनवणे यांना विजयी घोषीत करण्यात आले. त्यांनी पंकजा मुंडे यांचा सहा हजार 585 मतांनी पराभव केला.

Dattatrya Deshmukh

Beed Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव केला. बजरंग सोनवणेंना सहा लाख 81 हजार 569 मते मिळाली. तर, पंकजा मुंडे यांना सहा लाख 74 हजार मते मिळाली. बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजयी झाले. वंचित बहुजन आघाडी बीडमध्ये चौथ्या स्थानावर गेली. तर, याहून अधिक मते बहुजन महापार्टीचे अशोक थोरात यांनी घेतली.

भाजपने या निवडणुकीत सलग दोनदा खासदार राहीलेल्या डॉ. प्रीतम मुंडेंची उमेदवारी टाळून पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरविले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलेल्या बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी ऐनवेळी रिंगणात उतरविले. मागच्या वेळीही बजरंग सोनवणे प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रिंगणात होते. त्यांचा तब्बल एक लाख 68 हजार मतांनी पराभव झाला होता.

यावेळी पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यासह वंचितचे अशोक हिंगे, बहुजन महापार्टी पक्षाचे अशोक थोरात यांच्यासह 41 उमेदवार रिंगणात होते. भाजपच्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात सुरुवातीपासून काट्याची टक्कर झाली.

13 मे रोजी झालेल्या मतदानाचा टक्काही वाढल्याने (70.92 टक्के) वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार असा प्रश्न होता. तसेच, मुस्लिम समाजाचे 20 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे वंचित, मुस्लिम उमेदवार कोणाच्या मतांचे गणित चुकविणार असे आडाखे बांधली जात होती.

दरम्यान, मंगळवारी (ता. चार) मतमोजणीनंतर उशिरा बजरंग सोनवणे यांना विजयी घोषीत करण्यात आले. त्यांनी पंकजा मुंडे यांचा सहा हजार 585 मतांनी पराभव केला.

वंचित चौथ्या स्थानी; बसपाला अधिक मते

दरम्यान, मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार प्रा. विष्णू जाधव यांनी 92 हजारांवर मते घेतली होती. यावेळी वंचितने विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे यांना रिंगणात उतरविले. हिंगे यांना 50 हजार 733 मते मिळाली. तर, बहुजन महापार्टीचे अशोक थोरात 54 हजार 783 मते घेऊन तिसऱ्या स्थानावर राहीले.

मुंडेंसाठी मोदींची सभा; मातब्बर नेते

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेत्यांनी सभा घेतल्या. केंद्रात व राज्यातील सत्ता, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस, लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा तसेच राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे तसेच खासदार डॉ. प्रीतम मुंडे आदी अर्धा डझन माजी आमदरांची फौज मैदानात होती. तरीही त्यांचा पराभव झाला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT