Fulchand Karad Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : बीडचं राजकारण तापलं; बजरंग सोनवणेंच्या प्रचारात सक्रिय फुलचंद कराडांना जीवे मारण्याची धमकी

Beed Lok Sabha Election : एप्रिलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुदामती गुट्टे यांना बजरंग सोनवणे यांचा प्रचार करायचा नाही, अन्यथा पिस्तुलाने खून करू म्हणत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Sunil Balasaheb Dhumal

Beed Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांना शुक्रवारी (ता. 10) मोबाईलवरुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबद्दल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुदामती गुट्टे यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गटाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड हे या लोकसभा निवडणुकीत सक्रिय होते. ते शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता आपल्या कार्यालयात कार्यकारीणीची बैठक घेत होते. त्यावेळी त्यांना फोन आला व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच कराड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतरही या फोनवरुन त्यांना सारखे फोन येत होते. त्याद्वारे धमक्या दिल्या जात होत्या.

दरम्यान, मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास कराड हे आपल्या निवासस्थानी असताना 10 ते 15 जण तोंडाला बांधून आले व घराचे दार वाजवून बाहेर ये असे म्हणत होते. हा आवाज ऐकून कराड हे घराच्या टेरेसवर जावून आवाज दिल्यानंतर गल्लीतील लोक जागे झाल्याने ते हल्लेखोर पळून गेल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत फुलचंद कराड Fulchand Karad म्हणाले, भाड्याच्या लोकांमार्फत माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरणारा नाही. परळी व तालुक्यात कुणाची गुंडगिरी आहे हे सर्वांना माहीत आहे. मागील काळात झालेल्या सर्व खुनांच्या घटनांची सखोल चौकशी करावी, मला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा तपास करुन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कराड यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, यापूर्वी 20 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुदामती गुट्टे यांना बजरंग सोनवणे यांचा प्रचार करायचा नाही, अन्यथा पिस्तुलाने खून करू म्हणत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT