Jyoti Mete, Pankaja Munde sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : पंकजा मुंडेंकडून 'शिवसंग्राम' अन् दिवंगत मेटेंच्या फोटोचा वापर; बीडमध्ये वादाची ठिणगी

Loksabha Election 2024 : या लोकसभा निवडणुकीत राज्यपातळीवरून शिवसंग्राम महायुतीचा घटक पक्ष असल्याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे आज तरी शिवसंग्राम तटस्थ आहे

Datta Deshmukh

Beed News : बीड लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडून खोडसाळपणे शिवसंग्रामच्या नावाचा व दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या फोटोचा दुरुपयोग करण्यात येत आहे

'शिवसंग्राम'विषयी मनामध्ये प्रचंड द्वेषाची भावना असलेल्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे व त्यांच्या टीमने खोडसाळपणे भाजपचा घटक पक्ष म्हणून प्रचार सभेच्या स्टेजवरील बॅनरवर शिवसंग्रामचे नाव टाकले जात आहे. तसेच,दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांचा फोटो वापरून जनतेत संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आला.

महाराष्ट्रभर भाजपकडून शिवसंग्रामचे नाव व फोटो कोठेही वापरण्यात येत नाही. गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर शिवसंग्राम युतीचा घटक असल्याने फोटो व नाव छापले जात असताना बीडमध्ये भाजपने शिवसंग्रामचे व नाव व फोटो छापले नाहीत. दिवंगत लोकनेते विनायक मेटे Vinayak Mete यांना कायम अनाठायी विरोध केला.

आता मतदारांची सहानुभूती घेण्यासाठी शिवसंग्रामचे नाव टाकले जात आहे. या निवडणुकीत शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे Jyoti Mete यांनी महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. तेव्हापासून महायुतीच्या नेत्यांनी संभ्रम निर्माण करून डॉ. ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोपही केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या लोकसभा निवडणुकीत राज्यपातळीवरून शिवसंग्राम महायुतीचा घटक पक्ष असल्याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे आज तरी शिवसंग्राम तटस्थ आहे. याबाबत विरोधकांनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू नये तसेच शिवसंग्रामचे नाव व दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या फोटोचा वापर करू नये, असे आवाहन शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT