Vinayak Mete: ...अन् दिवंगत मेटेंच्या पत्नी-मुलगा व्यासपीठावरच एकमेकांच्या गळा पडून रडले

Beed Political News : दिवंगत नेते विनायकराव मेटे यांनी राजकारण करताना समाजकारणाला अधिक महत्व दिले.
Vinayak Mete
Vinayak MeteSarkarnama

Beed News : दिल दिया है जान भी देंगे,ऐ वतन तेरे लिये हे गीत वाजत होते आणि दिवंगत नेते विनायकराव मेटे यांचा मुलगा आशुतोष हातात तिरंगा ध्वज फडकवत होता. मेटे याच पद्धतीने तिरंगा ध्वज फडकवत याची आठवण झाली आणि आशुतोष यांना अश्रू आवरता आले नाहीत.व्यासपीठाच्या खाली असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे देखील व्यासपीठावर चढल्या आणि दिवंगत मेटेंच्या आठवणीने हे दोघे एकमेकांच्या गळा पडून रडले.यावेळी उपस्थितांनाही हुंदके आवरले नाहीत.

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांनी राजकारण करताना समाजकारणाला अधिक महत्व दिले. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, आरबी समुद्रातील शिवस्मारक आदी मुद्दे अजेंड्यावर घेऊन समाजकारण करणाऱ्या मेटेंनी सामुदायिक विवाह चळवळही जोरदारपणे राबविली.

Vinayak Mete
Prakash Ambedkar News : आमची अवस्था `मान न मान मै तेरा मेहमान`..

व्यसनमुक्तीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. थर्टी फर्स्टला तरुण पार्टी करतात आणि तेथूनच त्यांच्या व्यसनाला सुरुवात होते. त्यामुळे या युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत सुगंधी दुधाने व्हावे, अशी संकल्पना मांडून त्यांनी कामही हाती घेतले.

मागचे काही वर्षे बीड शहरातून सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी भव्य व्यसनमुक्ती फेरी निघे आणि रात्री नामवंत कलावंतांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होई. रात्री १२ वाजेच्या दरम्यान दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये या देशभक्तीपर गीताने या कार्यक्रमाची सांगता होत असत. या गीतावेळी खुद्द मेटे कलाकावंतांसमवेत व्यासपीठावर जाऊन तिरंगा ध्वज फडकवत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी गेल्या वर्षीपासून हे अभियान हाती घेतले आहे. अभियानांतर्गत शनिवारी (ता. ३०) शहरातून व्यसनमुक्ती फेरी निघाली. तर, रविवारी (ता. ३१) झेंडा फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांचा लावणी भुलली अभंगाला हा सास्कृतिक कार्यक्रम झाला. वर्ष संपत होते आणि नववर्षाची सुरुवात होणार असल्याने रात्री १२ वाजता कलावंतांनी दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये हे गीत गायला सुरुवात केली.

यावेळी त्यांचे पुत्र आशुतोष मेटे (Ashutosh Mete) तिरंगा ध्वज हाती घेऊन फडकवू लागले. पण, अचानक त्यांना वडिलांची आठवण झाली आणि त्यांनी व्यासपीठावरच आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. मुलाची ही स्थिती पाहून त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटेही व्यासपीठावर चढल्या आणि मुलाच्या गळ्यात पडून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. या भावनिक दृश्याने उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत.

(Edited By DeepaK Kulkarni)

Vinayak Mete
Parthadi News : लोकप्रतिनिधीला हप्ता न दिल्याने रस्त्याचे काम बंद पाडले; पाथर्डीतील प्रकाराची जिल्हाभर चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com