Beed crime update : बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात परळी पूर्ण हादरून जाईल इतकी मोठी नावे समोर येणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या विधानाने खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांच्या या विधानाचे आता राजकीय तर्क काढले जाऊ लागले आहेत.
विशेष करून, बीडसह परळी अन् मराठवाड्यात जरांगे पाटील यांच्या या विधान चर्चेत आलं आहे. राजकीय नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी सूचक चर्चेचा सूर अवळल्याने, जरांगे पाटील यांच्या या सूचक विधानाने पुन्हा राजकीय वातावरण तापणार असल्याचे संकेत आहेत.
बीडमधील (Beed) महादेव मुंडे हत्या प्रकरणातील वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या असून अहवाल आता एसआयटीकडे (SIT) सुपूर्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं पत्रकारांशी संवाद साधताना, यावर मोठं विधान केलं.
जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले,"ही कायदेशीर प्रक्रिया असून नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचा अहवाल आल्यानंतर तो कोर्टापुढे सादर केला जाईल. दरम्यान, या प्रकरणात भविष्यात समोर येणाऱ्या मोठ्या नावांमुळे परळी हादरून जाईल."
तसेच, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातले असून तपास एसआयटीमार्फत पुढे नेण्यात येत आहे, असे सांगत तपास यंत्रणेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून, काही माहिती असूनही आपण सध्या ती उघड करणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येला दोन वर्षे उलटले असून, आता या प्रकरणाचा तपास अंतिम आणि निर्णायक टप्प्यावर आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने केलेल्या दोन साक्षीदारांच्या ‘नार्को’ आणि एकाच्या ‘ब्रेन मॅपिंग’ चाचणीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असून, यामुळे हत्येचे गूढ उकलण्याची शक्यता बळावली आहे.
तांत्रिक पुराव्यांच्या अभावामुळे तपासात अडथळे येत होते. त्यामुळे एसआयटीने वैज्ञानिक चाचण्यांचा आधार घेतला. पहिल्या टप्प्यात आर्थिक व्यवहार असलेल्यांची, तर दुसऱ्या टप्प्यात महत्त्वाच्या साक्षीदारांची चाचणी करण्यात आली. तसंच 12 साक्षीदारांची मानसशास्त्रीय तपासणीही पूर्ण झाली आहे. 200 लोकांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली. 150 संशयितांचे कॉल डिटेल्स तपासले. 1500हून अधिक लोकांच्या माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आलं आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गोट्या गीते हा अजूनही फरार असून, त्याच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे. तो हाती लागल्यानंतर तपासाला अधिक गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.