Beed News: बीड जिल्ह्यात अल्पवयीन विवाहित महिलेला घरातून उचलून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. माणुसकीला शरमेनं मान खाली घालण्यास भाग पाडत आरोपींनी अत्याचारानंतर संबंधित महिलेला गावच्या चावडीवर एका खांबाला बांधून ठेवलं होतं. या घटनेनं बीडसह संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. आता या प्रकरणी राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतल्यानंतर पोलिसांच्या कारवाईची आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
केज तालुक्यातील पिंपळनेर येथे एका महिलेला घरातून उचलून नेत तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही उमटले होते. आता सद्यस्थितीत पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 137(2),333,64(2)(i) आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलिस प्रशासनाला पीडित मुलीचा बालविवाहाच्या दृष्टीनेही गुन्हा दाखल करून लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे तसेच या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आता कारवाईला वेग आला असून पीडित महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आता तिच्या पतीसह आई-वडील व सासू-सासरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा बालविवाह होत असताना कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणात गावचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. पुढील तपासात पतीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, अशी माहिती बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथील महिला रात्री घरी झोपलेली असताना घरातून उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून रात्रभर गावच्या चावडीवर बांधून ठेवल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रकरणाचे तपास अधिकारी अतुलकुमार लांडगे यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे 10 मार्च धक्कादायक घटना घडली होती. रात्रीच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत घरी झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर तिला गावाजवळ असलsल्या नदीपात्रात नेत तिच्यावर अत्याचार करुन एका खांबाला बांधल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर, महिला आयोगानेही याची दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांस दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.