Govind Barge Case: माजी उपसरपंच आत्महत्येप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट;'नर्तिके'ची पोलिसांसमोर मोठी कबुली; कला केंद्राच्या नावाखाली 'सेक्स रॅकेट'?

Beed Deputy Sarpanch Govind Barge : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांचा सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात त्यांच्याच कारमध्ये मृतदेह सापडला होता. त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्या होत्या. तर बर्गेंनी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती.
Dead Upsarpanch Govind Barge and Pooja Gaikwad
Dead Upsarpanch Govind Barge and Pooja Gaikwadsarkarnama
Published on
Updated on

Madha News: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यांनी स्वत:ला बंदुकीतून गोळी झाडून जीवनयात्रा संपवली होती. यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत कला केंद्रातील 21 वर्षीय नर्तकी पूजा गायकवाडला अटक केली. ज्यात या नर्तिकेशी उपसरपंच गोविंद बर्गे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समोर आली होती. आता याचप्रकरणी हादरवणारी माहिती समोर आली आहे.

माजी उपसरपंच असलेल्या गोविंद बर्गे यांनी कलाकेंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात फसल्यानंतर आत्महत्या केली होती. या प्रकरणानं संपूर्ण राज्यात खळबळ उडवली होती. आता त्याच कला केंद्रावर टेंभूर्णी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी रविवारी (ता.15 मार्च) माढा तालुक्यातील मोडनिंब येथील ‘स्वरांजली कला केंद्र’ वर धाड टाकली होती.

यावेळी पोलिसांनी तब्बल 25 तरुणींची सुटका केली होती. या छापेमारीनंतर पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी व अनैतिक व्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे हे स्वरांजली कला केंद्र पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू होतं. पण कला केंद्राच्या नावाखाली येथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना उशिरा का होईना यश आलं.

बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तिका पूजा गायकवाडने टेंभूर्णी पोलिसांसमोर मोठी कबुली दिली आहे. यात तिने मोडनिंब येथील कला केंद्रात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटमध्ये स्वत: अडकल्याचं सांगितलं आहे. माजी उपसरपंच बर्गेंसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचं पूजाने यापूर्वीच पोलिसांना सांगितलं होतं.

Dead Upsarpanch Govind Barge and Pooja Gaikwad
Chhagan Bhujbal News: मंत्री भुजबळांनी 'गॅस तुटवड्या'वर मात करण्यासाठी घेतला मोठा निर्णय, फडणवीस सरकार आता 'केरोसिन' वाटप करणार

टेंभूर्णी पोलिसांनी स्वरांजली कला केंद्रावर टाकलेल्या धाडीत ज्या गोष्टींची कल्पनाही केली नव्हती,त्या समोर आल्या आहेत. याठिकाणी केलेल्या छापेमारीत पोलिसांना अश्लील वस्तू, रेकॉर्डिंग डिवाइसेससह इतरही बरंच धक्कादायक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासात या कला केंद्रावर सर्रासपणे हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचं नियोजन होत असल्याचं समोर आलं आहे.

कला केंद्रावर महिलांना नृत्याच्या नावाखाली अनैतिक कामं करायला भाग पाडलं जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणात पोलिसांच्या तपासात आणखी मोठे धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मुख्य सूत्रधारांसह आणखी काही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

Dead Upsarpanch Govind Barge and Pooja Gaikwad
NCP News : शशिकांत शिंदेंच्या होमग्राऊंडवर भाजपचा सभापती : सख्खी भावजयच तटस्थ राहिल्याने फिरली समीकरणं, शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा पराभव

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांचा सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात त्यांच्याच कारमध्ये मृतदेह सापडला होता. त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्या होत्या. तर बर्गेंनी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. धक्कादायक म्हणजे ही घटना नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत घडली होती. त्यावरून आता बर्गे यांच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com