Walmik Karad accused Sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad accused : वाल्मिक कराड कोर्टात पहिल्यांदा बोलला; न्यायाधीशांनी फटकारलं, तरी तो बोलतच राहिला...

Beed Massajog Santosh Deshmukh Murder Case: Judge Scolds Main Accused Walmik Karad : बीड मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या खटल्याच्या सुनावणीत वाल्मिक कराडला न्यायाधीशांनी फटकारलं आहे.

Pradeep Pendhare

Santosh Deshmukh murder case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायाधीशांनी सर्व आरोपींना गुन्ह्याबाबत माहिती दिली.

गुन्ह्याची माहिती देत असताना, वाल्मिक कराड याला देखील न्यायाधीशांनी गुन्हा कबूल आहे का? असा प्रश्न केला. वाल्मिक कराड याने गुन्हा कबूल नसल्याचे सांगून, पुढे बोलत राहिला. यावर न्यायाधीशांनी त्याला फटकारले. सुनावणीत हा प्रसंग निर्माण झाल्याने काही काळ कोर्ट रूममधील वातावरणात तणावपूर्ण शांतता होती.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या (BEED) जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23वी सुनावणी झाली. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता. तसेच संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडिओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले.

न्यायाधीशांकडून संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील आरोपींना वाल्मिक कराड याला गुन्हा कबूल आहे का? असा प्रश्न केला. वाल्मिक कराड याने गु्न्हा कबूल नसल्याचे सांगितले. यानंतर मला काही बोलायचे आहे, सांगण्याची इच्छा आहे, असा म्हटला. यावर न्यायाधीशांनी यावर वाल्मिक कराड याला, तुम्हाला जेवढं विचारलं, तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका, अशा शब्दात फटकारलं.

न्यायाधीशांनी फटकारल्यानंतर देखील वाल्मिक कराड बोलतच राहिला. मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवले आहे, असे म्हटला. यानंतर न्यायाधीश वाल्मिक कराड याच्याकडे बघत राहिले. या प्रसंगामुळे कोर्ट रूमध्ये तणावपूर्ण शांतता पसरली होती. आता पुढची सुनावणी आठ जानेवारीला होणार आहे.

खटला वेगानं चालवला जाणार

विशेष सरकारी वकील उज्वल निकम आजच्या सुनावणीला सरकार पक्षाकडून हजर होते. सुनावणीनंतर त्यांनी न्यायालयातील कामकाजीची माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले, "आज आरोप निश्चित केले गेले. खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून, संतोष देशमुख यांची हत्या केली. आजही आरोपी वकिलांनी या खटल्यात, 'डी फॉर डीले आणि डी फोर डिरेल' केले." प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल. तीच तीच कारणे न्यायालयात मांडली जात होती. त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा, अशी विनंती केली. खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे उज्वल निकम यांनी सांगितले.

देशमुखांची निर्घृणपणे हत्या अन् महाराष्ट्रभर संताप

बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृणपणे हत्या झाली. सुदर्शन घुले, जयराम चाटे, श्रीकृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या सहा आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात नेत, क्रूरपणे मारहाण केली. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. 15 व्हिडिओ आणि 8 फोटो आरोपीकडे मिळाल्याची पोलिस तपासात नोंद आहे.

1800 पानांचे दोषारोपपत्र

मारहाणीचे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्याने, राज्यात संतापाची लाट उसळली होती. 12 मार्चला या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली. पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचे दोषारोपपत्र सादर केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT