Beed Massajog Sarpanch Election Sarkarnama
मराठवाडा

Beed Massajog Sarpanch Election : संतोष देशमुखांच्या लढाईत खंबीर उभा होतो, पुढेही राहणार! सरपंच स्वरूपानंद देशमुखांचा विजयानंतर दमदार इशारा

After defeating late Sarpanch Santosh Deshmukh wife Ashwini in Massajog village, newly elected Sarpanch Swarupanand Deshmukh shares his first reaction : राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोग गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयानंतर सरपंच स्वरूपानंद देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Pradeep Pendhare

Massajog gram panchayat election : राज्याचे लक्ष लागलेल्या, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीचा निकाल अनेकांना धक्का दिला.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांना पराभवाला समोरे जावं लागले आहे. या निवडणुकीत विजयी झालेले स्वरूपानंद देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मस्साजोग गावच्या सरपंचपदाच्या (Sarpanch) निवडणुकीतील विजयानंतर सरपंच स्वरूपानंद देशमुख यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला. या निवडणुकीत माझ्यावर गंभीर आरोप झाले. पण ही निवडणूक गावच्या विजयाची असल्याचे स्वरूपानंद देशमुख यांनी सांगितले.

स्वरूपानंद देशमुख म्हणाले, "माझ्यावर कोणी काय आरोप केले, यापेक्षा माझ्या गावकऱ्यांचा आणि मतदार (Voter) राजा माझ्यासोबत राहिला. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे हा विजय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे."

या अगोदरही संतोष देशमुख, यांच्या लढाईमध्ये मी समोर होतो आणि यापुढेही संतोष देशमुख यांच्या लढाईमध्ये समोर असेल. हा विजय माझ्या स्वाभिमानी गावातील मतदारांचा आहे. माझ्या नव युवकांना येणाऱ्या काळामध्ये गावातील, काम कोण करू शकतो, हा विश्वास ठेवून मला गावकऱ्यांनी निवडून दिलेले आहे. यामुळे माझा हा विजय झालेला आहे, असेही स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटलं आहे.

मस्साजोग गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांचा पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी यांचा 92 मतांनी विजय झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT