Govind Mokate Bypoll History : गोविंद मोकाटेंचा पोटनिवडणुकीतील विजयाचा 'ट्रॅक रेकॉर्ड भारी'; 'राहुरी'च्या निकालाची वाढली धडधड!

Govind Mokate bypoll win record Rahuri election: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची उत्सुकता असतानाच, शरद पवार राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांच्या पोटनिवडणुकीतील विजयाचा इतिहास समोर येत आहे.
Rahuri constituency bypoll latest updates
Rahuri constituency bypoll latest updatesSarkarnama
Published on
Updated on

Rahuri Assembly By Election News: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी नाही करायचा निर्णय घेतल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली. गोविंद मोकाटे यांची उमेदवारी प्रतिस्पर्धी भाजपला निवडणुकीत सोपी वाटली.

परंतु त्यांचा पोटनिवडणुकीतील विजयाचा 'ट्रॅक रेकाॅर्ड भारी' आहे. तो राहुरी निकालापूर्वी चर्चेत आल्याने सत्ताधारी भाजप गोटात अस्वस्थता निर्माण करत आहे. यातच गोविंद मोकाटे यांच्याकडून वारंवार, विजय आपला होणार असल्याचे विधान होत असल्याने, निकालाची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे.

राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार अक्षय कर्डिले, शरद पवार राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे, वंचितचे संतोष चोळके, शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर रावसाहेब खेवरे यांच्यासह सात उमेदवार रिंगणात होते. यातच पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्के खूपच घसरला आहे. तब्बल 55.89 टक्के मतदान झालं आहे.

भाजपने विजयासाठी पहिल्यापासून जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह 40 स्टार प्रचारक मैदानात उतरवलं होतं. शरद पवार राष्ट्रवादीकडून खासदार नीलेश लंके मैदानात होते. वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर मैदानात होते.

Rahuri constituency bypoll latest updates
Eknath Shinde Shiv Sena conflict : शिवसेनेत बंडाळीची चाहूल? गोऱ्हे-कडूंच्या नावांवरून तणाव, शिंदे काय खेळी करणार?

या नेत्यांनी राहुरी पोटनिवडणुकीचं वातावरण चांगलच तापवलं. परंतु मतदानाचा टक्का घसरला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी राहुरीत 74 टक्के मतदान झाले होते. आता पोटनिवडणुकीत 55.89 टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा घसरलेला आकडा हा चिंताजनक आहे.

Rahuri constituency bypoll latest updates
Prajakt Tanpure Rahuri Bypoll Result : मतदानाचा घसरलेला टक्का, प्राजक्त तनपुरेंचा समर्थकांना 'तो' निरोप; निकालाआधीच राहुरीत 'धडधड' वाढली!

राहुरी पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला

राहुरी पोटनिवडणुकीत 3 लाख 33 हजार 545 मतदान होते. त्यापैकी 1 लाख 86 हजार 504 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महिला मतदारांचे प्रमाण अत्यंत कमी असून ते 84 हजार 414 एवढं आहे.

आता मतदानाची मोजणी चार मे रोजी होणार आहे. तत्पूर्वी गोविंद मोकाटे यांच्याकडून विजयाचे वारंवार उल्लेख होत आहे. हाच उल्लेख सत्ताधारी भाजपला अस्वस्थता करणारा ठरू लागला आहे. कारण गोविंद मोकाटे यांचे पोटनिवडणुकीतील ट्रॅक रेकाॅर्ड भारी आहे.

पोटनिवडणुकीतून मोकाटेंची राजकारणात एन्ट्री

गोविंद मोकाटे हे 2013 मध्ये पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीला समोरे गेले होते. पंचायत समिती सदस्य रामदास आव्हाड यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक झाली. भाजपने त्यांच्याच पत्नी सुमन यांना उमेदवारी देऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही. भाजप-सेना युती व राष्ट्रवादीनेही ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

मोकाटेंचा पोटनिवडणुकीत 75 मतांनी विजय

भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रचार यंत्रणा राबवली होती. घरोघर जाऊन प्रचार केला होता. पण गोविंद मोकाटे यांनी विजयश्री खेचून आणला होता. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोविंद मोकाटे (5 हजार 434 मते) 75 मते घेऊन विजयी झाले होते. भाजपच्या सुमन रामदास आव्हाड (5 हजार 359 मते मिळाली होती.

तनपुरेंची यंत्रणा मोकाटेंसाठी राबली

भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांना त्यावेळी पराभवाचा जोरदार धक्का बसला होता. कर्डिले यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीकडून मोकाटे यांनी मुसंडी मारुन त्यांना धोबीपछाड दिला.

काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता व प्रचारात भाग न घेता तटस्थ भुमिका घेतली होती. राष्ट्रवादीचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनीही प्रचार सभा घेतल्या. राहुरीचे प्राजक्त तनपुरे यांनी देखील इथं प्रचार यंत्रणा राबवली होती.

भाग्यश्री मोकाटेंचा विजय

गोविंद मोकाटे यांची मुलगी भाग्यश्री मोकाटे यांनी देखील 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जेऊर गटातून विजय मिळवला होता. ही निवडणूक मोकाटे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढली होती.

इथंही विजय घेताना, भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या बालेकिल्ल्याला मोकाटे यांनी खिंडार पाडले होते. विशेष म्हणजे ही निवडणूक विषारी बनावट दारूकांडमुळे गाजली होती.

पोटनिवडणुकीती चार मे रोजी मतमोजणी

गोविंद मोकाटे आता पुन्हा एकदा राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. मतदान झाले आहे. आता चार मे रोजी मतमोजणी होणार आहे. गोविंद मोकाटे यांचा पोटनिवडणुकीतील विजयाचा ट्रॅक रेकाॅर्ड पाहाता, निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com