Beed News, 21 Dec : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनात बोलताना सांगितलं. विरोधकांनी आणि सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी हे प्रकरण चांगलंच ताणून धरलं होतं.
त्यामुळे अखेर शुक्रवारी सभागृहात या प्रकरणावर फडणवीस (Devendra Fadavis) यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या कारभारावर नाराजी दर्शवली. शिवाय पोलिसांनी कारवाई करण्यात कुचराई केल्याचं म्हटलं. याचवेळी त्यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली करणार असल्याचंही वक्तव्य केलं होतं.
अशातच आता फडणवीस यांनी पोलिस अधीक्षकांच्या बदलीची घोषणा केली त्याला 24 तास पूर्ण होण्याआधीच अविनाश बारगळ (Avinash Bargal) उचलबांगडी करण्यात आली आहे. बारगळ यांच्या जागी आता नवनीत कांवत (Navneet Kanwat) हे बीडचे नवे पोलिस अधीक्षक असणार आहेत.
शुक्रवारी विधानसभेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्यांचा ज्यांचा समावेश असेल, मग ते कोणीही असोत त्यांच्यावर मोक्का लवाला जाईल. तसंच मी पोलिस महासंचालकांना देखील सांगितलं आहे की, यामध्ये पोलिस प्रशासनाचाही दोष आहे.
पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय, हे बघायला पाहिजे होतं. मागील काळात ते निर्ढावलेले प्रकारचे काम करताना दिसत आहेत. मात्र, यापुढे ते सहन केलं जाणार नाही. दरम्यान, या हत्येप्रकरणी दोन प्रकारे चौकशी आम्ही केली जाईल, एक म्हणजे पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांतर्गत एसआयटी चौकशी आणि दुसरी न्यायालयीन चौकशी केली जाईल. ही चौकशी साधारणपणे 3 ते 6 महिन्यात पूर्ण करू असंही त्यांनी यावेळी आश्वासन दिलं.
तसंच यावेळी त्यांनी बीडच्या (Beed) पोलिस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, "मागील काही काळातील जी प्रकरणे समोर येत आहेत, त्या सगळ्यांत पोलिस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतला आहे." तर फडणवीसांनी घोषणा केल्यानंतर आज लगेच अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.