बीड : नऊ वर्षांनी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल मतदानानंतर तीन आठवड्यांनी आज रविवारी लागला. यात अंबाजोगाईत आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे नगराध्यक्ष पदावर विजयी झाले. तर, धारुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब जाधव यांनी बाजी मारली.
गेवराईत बाळाराजे पवारांनी सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले. येथून भाजपच्या गिता पवार विजयी झाल्या. परळीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद्मश्री धर्माधिकारी यांनी 28091 एवढ्या मताधिक्याने विजय मिळवला तर पराभूत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संध्या देशमुख यांना 12429 मते मिळाली.
जिल्ह्यातील बीडमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी तिरंगी लढत झाली. तर, गेवराईत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना रंगला. परळीत निवडणुकीत महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस अशी तिरंगी तर अंबाजोगाईत भाजपकडून परिवर्तन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येत लोकविकास आघाडी झाली.
धारुर व माजलगावमध्येही तिरंगी सामने रंगले. यात अंबाजोगाईत भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकिशोर मोदी यांच्यात झालेल्या सामन्यात मुंदडांनी बाजी मारली. मात्र, माोदींच्या आघाडीने 20 जागा जिंकल्या आहेत. तर, मुंदडा गटाला केवळ 11 जागा जिंकता आल्या. धारुरमध्ये भाजपची सत्ता उलटवण्यात आमदार प्रकाश सोळंके यांना यश आले. इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बालासाहेब जाधव विजयी झाले.
गेवराईतील सत्ता राखण्यात माजी आमदार लक्ष्मण पवार व बाळराजे पवार यशस्वी ठरले. या ठिकाणी भाजपच्या गिता पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल दाभाडे यांचा पराभव केला. तसेच बीडमध्ये भाजपच्या (BJP) ज्योती घुमरे या पराभूत झाल्या आहेत. प्रेमलता पारवे यांना 35815 मते मिळाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.