

Devendra Fadnavis: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाकीत खरं ठरलं आहे. त्यानुसार राज्यात ७५ टक्के नगराध्यक्ष हे महायुतीचे निवडून आले आहेत. यामध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. खुद्द फडणवीसांनी पत्रकार परिषदे याची माहिती दिली. तसंच एकूणच निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
फडणवीस म्हणाले, मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की, एकूण जी काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यातील ७५ टक्के हे महायुतीचे निवडून येतील, तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्रातील जनतेनं दिलेला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्ष हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. आत्तापर्यंत १२९ नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आले आहेत. तर आमच्या तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष निवडून आले आहेत ते ७५ टक्के आहेत.
तसंच नगरसेवकांचा विचार केला तर भाजपनं यात नवीन रेकॉर्ड केला आहे. २०१७ साली आम्ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष होतो तेव्हा आमचे १६०२ नगरसेवक होते आणि त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त ३३२५ नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळं एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्यांपैकी ४८ टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे.
एक प्रकारे विधानसभेची कामगिरी आम्ही पुन्हा एकदा करुन दाखवलेली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती. त्यांच्या नेतृत्वातील या पहिल्या निवडणुकीत हे प्रचंड यश भाजपला मिळालं. यामध्ये रवींद्र चव्हाण, माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली. चांगला समन्वय साधला, पक्ष पक्षाची संघटना यात खूप चांगला संवाद स्थापित झाला यामुळं अभूतपूर्व विजय मिळाला. यामुळं २०१७ पेक्षाही मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे.
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत २८८ पैकी २२१ जागा या महायुतीला, ४७ जागा मविआला तर २० जागा इतर आघाड्यांना मिळाल्या आहेत. तसंच महायुतीतील २२१ पैकी १२४ भाजप, ६१ शिवसेना, ३६ राष्ट्रवादी काँग्रेस तर १२ जागा या महायुती समर्थक शहर विकास आघाड्यांना मिळाले आहेत. तसंच दुसरीकडं महाविकास आघाडीच्या ४७ जागांपैकी २७ काँग्रेस, १२ राष्ट्रवादी, ८ ठाकरे सेना तर इतरांना ८ जागा मिळाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.