Jansanman Yatra NCP Chief Ajit Pawar black banner in Beed Sarkarnama
मराठवाडा

Beed News: जनसन्मान यात्रा येण्यापूर्वीच झळकले काळ्या रंगाचे बॅनर; बीडकरांनी विचारला अजितदादांना जाब

Datta Deshmukh

Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) बीडमध्ये येत आहे. यात्रेच्या स्वागतासाठी बॅनर आणि कमानी शहरात झळकत असतानाच दुसरीकडे 'असंवेदनशील सरकारने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' अशा आशयाचे बॅनर देखील लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये असे बॅनर लागले आहेत.

बदलापूर, पुणे, अकोला, मुंबई, लातूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी पंधरा दिवसापासून घडलेल्या अत्याचारांच्या 10 घटनांचा तारीखवार उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. काळ्या रंगाच्या बॅनरवर मध्यभागी 'असंवेदनशील सरकारने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' अशा आशयाचा मजकूर आहे.

आज (गुरुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बीडमध्ये येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर आदी नेते बीडमध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागताच्या कमानी आणि बॅनर शहरात झळकत आहेत. पण हे बॅनरच अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत.

नगर नाका, अण्णा भाऊ साठे पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळीवेस, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अशा वर्दळीच्या ठिकाणी हे बॅनर झळकत आहेत. बॅनरवरील सवाल नेमका कुणी विचारला आहे, त्या संघटना, पदाधिकारी व पक्षाच्या नावाचा यात उल्लेख नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT